शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

श्री राम मंदिर प्रतिष्ठापनेला पनवेलमध्ये आनंदोत्सव; विद्युत रोषणाईसह गावोगावी रांगोळ्या 

By वैभव गायकर | Updated: January 21, 2024 19:39 IST

भक्ती संगीत, प्राणप्रतिष्ठा, दीपोत्सव व महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.

पनवेल:अयोध्या याठिकाणी होणाऱ्या भव्य श्री राम मंदिराची प्रतिष्ठापने निमित्त देशभरात उत्सव साजरा केला जात आहे. पनवेल मध्ये देखील हा आनंदोत्सव साजरा केला जात असुन पनवेल शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गावागावमध्ये देखील रांगोळ्या काढून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पनवेल शहरातीलवडाळे लेक याठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. खारघर शहरातील उत्सव चौकात देखील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.शहरभर गाड्या,चौकात जय श्री रामाचा जयघोष आणि भगवे झेंडे फडकताना दिसत आहेत. नवीन पनवेल येथील जय अंबेमाता मंदिर मैदान येथे भव्य कार्यक्रम होणार असून या ठिकाणी पंधरा हजार लाडू वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.

तसेच भक्ती संगीत, प्राणप्रतिष्ठा, दीपोत्सव व महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. खारघर,कळंबोली, खांदेश्वर ,कामोठा या ठिकाणी श्रीरामाच्या प्रतिमा घेवून गल्लोगल्लीत मिरवणूका काढल्या जात आहेत. मंदीरे दिव्यांनी उजळी असून भगवी दिवाळी असल्याचे वातावरण पनवेल मध्ये तयार झाले आहे. कळंबोली येथे राममंदिर जिर्णोद्धार व  प्राणप्रतिष्ठा सोमवार दि.22 रोजी कळंबोली येथील श्री राम मंदिर, एल.आय.जी  येथे अभिषेक, पूजन, होम हवन विधिसह  दुपारी 2 वा. श्रींरामाच्या मृर्तीची प्राणप्रतिष्ठा कलशा रोहन कार्यक्रम करण्यात येत आहे.पनवेल तालुक्यातील जवळपास 300 पेक्षा जास्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.विशेष म्हणजे सर्वपक्षीय नेते,पदाधिकारी आणि सामान्य नागरिक या आनंदोत्सवात सहभागी होत आहेत.

टॅग्स :Raigadरायगडpanvelपनवेल