शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

By admin | Updated: August 16, 2016 04:48 IST

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ६९वा वर्धापन दिन रायगड जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. गृहनिर्माण मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या हस्ते

अलिबाग : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ६९वा वर्धापन दिन रायगड जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. गृहनिर्माण मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या हस्ते येथील पोलीस परेड मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी पोलीस उपनिरीक्षक परेड कमांडर सुनील जायभाय यांच्या नेतृत्वाखाली विविध पोलीस दलाच्या पथकांनी पालकमंत्री महेता यांना मानवंदना दिली. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री महेता यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली अर्पण केली. महाड येथील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी होती. या घटनेबद्दल राज्यातच नव्हेतर देशभरात शोक व्यक्त केला गेल्याचे महेता यांनी नमूद केले. त्यानंतर उपस्थितांनी महाड येथील दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली. पालकमंत्री महेता यांच्या हस्ते या वेळी विविध पुरस्कारप्राप्त अधिकारी व विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले, जिल्हा पोलीस अधीक्षक मो. सुवेझ हक, अपर जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल आदी मान्यवर उपस्थित होते.या समारंभासाठी स्वातंत्र्यसैनिकांच्या पत्नी, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रसाद पाटील, उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) राजेंद्र दंडाळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के.बी. तरकसे, चिटणीस एम.एस. देशमुख, जिल्ह्यातील विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी उपस्थित होते. शहरी आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये ध्वजारोहण करून विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. (विशेष प्रतिनिधी)