शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात मराठी राजभाषा दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:34 IST

माय, मातृभूमी आणि मातृभाषेबाबत मार्गदर्शन : अलिबागमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनात मराठी भाषेचा गौरव

अलिबाग : श्रमिक मुक्ती दलाने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. त्या आंदोलनामध्ये आज मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. राज्यभरात सर्वत्र मराठी राजभाषा दिन साजरा केला गेला असेल; परंतु न्याय हक्कासाठी आंदोलन करणाºया शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणीच मराठी राजभाषा दिन साजरा करणे हाच खरा मराठी भाषेचा गौरव आहे, असे निवृत्त प्राध्यापक श्याम जोगळेकर यांनी स्पष्ट केले. माय, मातृभूमी आणि मातृभाषा याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

मराठीचा वापर व्यवहारात केला जातो. मात्र, सरकारी कार्यालय आणि न्यायालयामध्ये आजही मराठीचा वापर केला जात नाही. न्यायालयाचे निर्णय हे इंग्रजीतून दिले जातात, त्यामुळे सर्वसामान्यांना कळणार कसे? असा सवालही त्यांनी करून सरकारने या बाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले.

आजकाल पालक अगदी दोन-अडीच वर्षांतच आपल्या लहान मुलांना प्ले ग्रुप नर्सरीमध्ये टाकतात; परंतु ते मूल पाच वर्षांचे होत नाही, तोपर्यंत त्यांना लिहिण्यास प्रवृत्त करू नये. कारण त्यांचे डोळे, बोट आणि मनगट नाजूक असतात. लहान वयातच सवय लावल्याने त्याचे त्यांच्या डोळ्यावर, बोटांवर आणि मनगटांवर होतात. परिणामी, मुले दुसरी अथवा तिसरीमध्ये गेल्यावर लिहण्यास कंटाळा करतात, असेही प्राध्यापक श्याम जोगळेकर यांनी स्पष्ट केले.

शेतकरी आंदोलनास बसले आहेत, त्यांच्यासोबत अन्य सात जिल्ह्यांतील शेतकरी १२ ठिकाणी आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलनात सक्रिय असतानाही त्यांना मराठी राजभाषा दिवसाचा विसर पडलेला नाही, हे विशेष आहे, त्यांचे आंदोलन राज्यभरातील एकमेव आंदोलन आहे, असेही त्यांनी सांगितले.