शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गणपती सणाला गालबोट लावणाऱ्या गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करणार- डिसीपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2022 19:21 IST

डिजेच्या आवाजाने ध्वनी प्रदुषण होणार नाही याची दक्षता घ्यावी, गणपतीच्या मंडपात जुगार, पत्ते खेळणे बेकायदेशीर आहे.दारुड्यांचा धिंगाणा आवरण्याची जबाबदारी त्या त्या गणेश मंडळाची आहे

मधुकर ठाकूर

उरण : डीजे लाऊन ध्वनिप्रदूषण करणाऱ्या, गणपतीच्या मंडपात जुगार पत्ते खेळणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण होईल अशी आरास-देखावे उभारणाऱ्या मंडळावर गुन्हे दाखल करण्यात येतील अशी सक्त ताकीद देतानाच गणेशोत्सव साजरा करताना आपल्या बेकायदा कृतीतून सणाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन डिसीपी शिवराज पाटील यांनी उरण येथे केले. 

दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो आहे.त्यामुळे सर्वत्रच उत्साहाचे वातावरण आहे.या उत्सव साजरे करताना उरण तालुक्यातील नागरिक, गणेश मंडळांना कोणत्या समस्या भेडसावत आहेत आणि त्या दूर करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत यासाठी बुधवारी (२४) संध्याकाळी डिसीपी शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.उरण पोलिसांनी आनंदी हॉटेलमधील हॉलमध्ये आयोजित केलेल्या बैठकीसाठी न्हावा-शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर,उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील, न्हावा-शेवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे,उरण मुख्याधिकारी संतोष माळी,उरण महावितरणचे उप अभियंता विजय सोनवणे,नायब तहसीलदार नरेंद्र पेडवी,उरण तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे , गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध शासकीय कमिट्याचे पदाधिकारी,नागरिक उपस्थित होते.

या बैठकीत प्रामुख्याने वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा,बेकायदेशीर पार्किंगमुळे होणारे वाहतूक कोंडी, भटकी कुत्री- मोकाट गुरे, खड्डेमय रस्ते, तलाव, समुद्र या विसर्जन ठिकाणी होणारी गर्दी यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरुन जणू तक्रारींचा पाऊसच पाडला.नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेहमी सारखी गोलमाल उत्तरे देऊन वेळ मारुन नेली. गणेशोत्सवाला कुठल्याही प्रकारे गालबोट लागणार याची सर्वांनी च दक्षता घेण्याचे आवाहन डिसीपी शिवराज पाटील यांनी मार्गदर्शन करताना केले. डिजेच्या आवाजाने ध्वनी प्रदुषण होणार नाही याची दक्षता घ्यावी, गणपतीच्या मंडपात जुगार, पत्ते खेळणे बेकायदेशीर आहे.दारुड्यांचा धिंगाणा आवरण्याची जबाबदारी त्या त्या गणेश मंडळाची आहे.विद्युत रोषणाई करताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे.समाजात तेढ निर्माण होईल, भावना दुखावल्या जातील असे देखावे, कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांची गय केली  जाणार नसल्याचे सक्त ताकीद देतानाच अशी बेकायदा कृत्ये करणाऱ्या गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा सक्तीचा इशाराही शिवराज पाटील यांनी दिला.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव