शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे ट्रॅक वापराचा करार रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 23:50 IST

अनंत गीते : आरसीएफ कंपनीला भरला दम

अलिबाग : आरसीएफ कंपनीच्या अखत्यारित असणारा रेल्वे ट्रॅक एखाद्या खासगी कंपनी अथवा खासगी पोर्टला वापराला देण्याचा करार केला असेल तर आरसीएफ कंपनीने तो तातडीने रद्द करावा, अन्यथा कारवाईला तयार राहावे, असा सज्जड दम केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी दिला.

अलिबागला रेल्वे सुरू करताना आरसीएफ कंपनीच्या ट्रॅकचा वापर केला जाणार आहे; परंतु याच ठिकाणी एका खासगी कंपनीच्या पोर्टचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. आरसीएफ कंपनीच्या ट्रॅकचा वापर पूर्ण क्षमतेने खासगी कंपनीने केल्यास अलिबागला लोकल आणण्याचे स्वप्न भंगणार आहे. त्यामुळे गीते यांनी पीएनपी या खासगी कंपनीचे नाव न घेता आरसीएफ कंपनीला शिवसेना स्टाइलने फटकारले.

अलिबाग येथील शिवसेनेच्या कार्यक्रमात अनंत गीते बोलत होते. अलिबाग रेल्वेने जोडण्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. पेण आणि रोहे तालुके हे लोकलने जोडण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. आता माणगावपर्यंत रेल्वे नेण्यात येणार आहे; परंतु अलिबाग या जिल्ह्याच्या ठिकाणी रेल्वेसाठी अडथळा निर्माण होत आहे. येथील रेल्वे ट्रॅक हा आरसीएफच्या मालकीचा आहे. आरसीएफ कंपनी ही सरकारचा अंगीकृत भाग आहे, त्यामुळे आरसीएफ कंपनीने असे धाडस करू नये. रेल्वेमंत्री, खत व रसायनमंत्री आणि आरसीएफ प्रशासन यांना याबाबत पत्र व्यवहार करून या संबंधीची माहिती दिली असल्याचेही अनंत गीते यांनी सांगितले.कोकणातील रेल्वे विद्युतीकरण करण्यावर भरअलिबागमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यांना रस्त्यावरून प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यांना रेल्वेची सुविधा दिल्याने अलिबागकरांचेही जीवनमान बदलणार आहे. त्यामुळे आरसीएफ कंपनीने असे चुकीचे पाऊल उचलू नये, असा इशारा गीते यांनी दिला. कोकणातील रेल्वेचे विद्युतीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे, त्यामुळे कोकणात रेल्वे लवकरच विजेवर चालण्यास मदत मिळणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.