शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

उनप कर्मचारी, अधिकाऱ्यांनी शहरात राबविली स्वच्छता मोहीम; तासाभराच्या अभियानात ८० अधिकारी, कर्मचारी सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2023 11:13 IST

एक किमी अंतरावरून २० टन डेब्रिज, कचऱ्याची विल्हेवाट.

मधुकर ठाकूर, उरण : रायगड जिल्हाधिकारीं  डॉ. योगेश म्हसे यांच्या संकल्पनेतुन तसेच पनवेल उपविभागिय अधिकारी . राहुल मुंडके यांच्या  मार्गदर्शनाखाली रस्ता सुलभीकरण, सुशोभीकरण अंतर्गत उरण शहरातील आनंदनगर, वीर सावरकर मैदान ते राजपाल नाका या परिसरातील या एक किमी परिसरात शनिवारी (२४) सकाळी स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत २० टन डेब्रिज कचरा उचलण्यात आला. बॅनर हटवण्यात आले आहेत. रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आले. रस्त्यावर आलेल्या धोकादायक झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या.

या मोहिमेत उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे, बांधकाम अभियंता झुंबर माने, रचना सहायक सचिन भानुसे , लेखापाल सुरेश पोसतांडेल , प्रशासकीय अधिकारी अनिल जगधनी, आरोग्य निरीक्षक हरेश तेजी, माजी नगर सेवक तसेच उरण नगर परिषदेचे सुमारे ७०-८० कर्मचारी आदींनी सहभागी होत श्रमदान केले.

पुढील महिन्यात २६ जुलै २०२३ रोजी याच प्रकारे नागरिकांच्या सहभागतुन स्वछता अभियान राबविण्यात येणार आहे. या स्वच्छता अभियानात उरण शहरातील नागरिकांनी सहभाग घ्यावा आणि श्रमदान करावे असे आवाहन उरण नगर परिषदे मार्फत करण्यात आले आहे.दर महिन्यात राबविण्यात येणाऱ्या स्वछता मोहिमेमुळे उरण शहर कचरा मुक्त होण्यास मदत होईल असा विश्वास उनपचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :uran-acउरण