शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले रायगडावरून ‘हर घर सावरकर’ ची हाक; पालकमंत्री, आमदारांच्या उपस्थितीत अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2023 08:18 IST

आमदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरून ‘हर घर सावरकर’ या अभियानाला सुरुवात करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कमहाड :  राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आणि महाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरून ‘हर घर सावरकर’ या अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सावरकर समिती, पुणेतर्फे मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. 

सोहळ्याप्रसंगी उदय सामंत यांनी आपल्या मनोगतामध्ये  छत्रपती शिवरायांवर पाहिली आरती व अनेक शिवगीते लिहिणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढत, या अभियानाची सुरुवात स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरून होत आहे, याबद्दल आयोजक समितीचे विशेष कौतुक केले. गोगावले यांनी प्रत्येकाने रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक व्हावे, असे आवाहन केले. तसेच शिवराज्याभिषेकदिनी राज्याच्या तिनही दलाकडून शिवरायांना शासकीय मान्यवंदना देण्याचा मानसही यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमादरम्यान हर घर सावरकर समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वीर सावरकरांच्या शिवरायांवर रचित आरतीवर त्याचप्रमाणे शिवरायांच्या काही गीतांवर महिला नृत्यकलाकारांनी अप्रतिम नृत्य सादर केले. त्याचप्रमाणे ‘वीर सावरकर’ या महानाट्यामधील कलाकार अभिषेक शाळू याने या नाटकातील काही संवादाचे यावेळी सादरीकरण केले. यावेळी श्रीमंत बाजीराव पेशवा निवासी सैनिक शाळा तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांना सैनिकी शैलीत मानवंदना देत शौर्य प्रात्यक्षिके दाखवली. कार्यक्रमाला महाडच्या प्रांताधिकारी  प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार सुरेश काशीद, विशेष पोलिस दल अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, मान्यवर व्यक्ती, शिवभक्त व सावरकरप्रेमी संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

वर्षभरात घेणार ७५ कार्यक्रम सावरकर समिती ही पुण्यातील सावरकरप्रेमींचा एक समूह असून, या समितीतर्फे ‘हर घर सावरकर’ हे अभियान राबवले जात आहे. राज्यभरात वर्षभरात एकूण ७५ कार्यक्रम राबवले जाणार आहेत. अभियानाची सुरुवात किल्ले रायगडावर करण्यात आली. 

मी तात्पुरता पालकमंत्रीमी रायगडचा तात्पुरता पालकमंत्री आहे आणि ‘तात्पुरता’ हा शब्द मी का वापरत आहे हे गोगावले आणि मुख्यमंत्र्यांना माहिती आहे, असे सांगत पालकमंत्री उदय सामंत यांनी पालकमंत्री बदलाची शक्यता बोलून दाखवली.