शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्य संग्रहालयासह व्यवसाय प्रशिक्षण केंद्र एकाच छताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 05:03 IST

मत्स्य विभागाची कोळीवाड्यातील प्रशासकीय इमारत धोकादायक होऊन मोडकळीस आल्याने मत्स्य व्यवसाय विभाग सातत्याने टीकेचा धनी बनत होता.

- जयंत धुळपअलिबाग : मत्स्य विभागाची कोळीवाड्यातील प्रशासकीय इमारत धोकादायक होऊन मोडकळीस आल्याने मत्स्य व्यवसाय विभाग सातत्याने टीकेचा धनी बनत होता.धोकादायक इमारत पाडून त्याच ठिकाणी नवी इमारत बांधण्याकरिता येणाऱ्या सीआरझेडसह अन्य सर्व समस्यांची विघ्ने आता दूर झाली असून, आता नव्या इमारतीकरिता दोन कोटी ४६ लाख रुपये शासनाने मंजूर केले आहेत. नव्या प्रशासकीय इमारतीत मत्स्य संग्रहालयासह मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र आणि मत्स्यव्यवसाय संबंधित सर्व कार्यालये एका छताखाली आणण्यात येणार आहेत.गेल्या सात वर्षांपासून भाड्याच्या जागेतून होत होता कारभार जुन्या प्रशासकीय इमारतीची दुरवस्था झाल्यानंतर मत्स्यव्यवसाय विभागाची सर्व कार्यालये विखुरली गेली होती. गेल्या सात वर्षांपासून ही सर्व कार्यालये भाड्याच्या जागेतून आपला कारभार करत आहेत. जुन्या इमारतीचे बांधकाम पूर्णपणे पाडण्यात आले आहे. सर्व परवानग्या मिळविल्यानंतर २३ जानेवारी २०१८ रोजी कार्यारंभ आदेश मत्स्यव्यवसाय विभागाला देण्यात आला आहे. या संकुलासाठी दोन कोटी ४६ लाख रुपये खर्च येणार असून, याचे काम विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन कंपनीस देण्यात आले आहे.प्रशासकीय खर्चात होणार बचतसध्या या सर्व कार्यालयांचा कारभार भाड्याच्या जागेतून सुरू असून, प्रशिक्षण केंद्राला ३४ हजार ६८३ रुपये, तर मत्स्यव्यवसाय उपायुक्त कार्यालयाला २५ हजार ८०२ रु पये दरमहा भाड्यापोटी खर्च करावे लागतात. ते आता नव्या इमारतीच्या उभारणीअंती वाचणार आहेत.राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून या संकुलाचे बांधकाम होत आहे. ही इमारत मुख्यत: प्रशिक्षण केंद्रासाठी वापरली जाणार आहे. वर्गखोल्या, सभागृह यांच्यासह मत्स्यसंग्रहालय येथे होणार असल्याची माहिती जिल्हा मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी रत्नाकर राजम यांनी दिली आहे.संबंधित विभाग येणार एकत्रजुनी इमारत मोडकळीस आली होती. त्यामुळे ती पाडून नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी निधी मंजूर झाला असून कामाला सुरूवात झाली आहे.मत्स्यव्यवसायाशी संबंधित असणारे विभाग एकत्र येणार आहेत. प्रशासकीय कामाकाजाबरोबरच जिल्हाभरातून येणारे मच्छीमार, सोसायट्यांचे पदाधिकारी यांना हे सोयीचे होणार आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय उपायुक्त अभयसिंह शिंदे-इनामदार यांनी दिली आहे.मच्छीमार बांधवांचा त्रास होणार कमीमत्स्यव्यवसाय विभागाशी संबंधित कार्यालये एकाच ठिकाणी नसल्याने जिल्हाभरातून कामानिमित्ताने येणाºया मच्छीमार बांधवांना अनेक फेºया माराव्या लागत असत. परिणामी, मच्छीमार बांधवांना त्याचा खूप त्रास होत असे. आता या संकुलामध्ये परवाना विभाग, वसुली विभाग, उपायुक्तांचे कार्यालय, प्रशिक्षण केंद्र, मत्स्यसंग्रहालय असे विभाग असणार आहेत. यासह एक मध्यवर्ती सभागृह राहणार असून, या ठिकाणी मच्छीमार बांधवांकरिता कार्यक्र म घेता येणार आहेत.

टॅग्स :Raigadरायगड