शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

आढी गवळवाडीत बांधलेले बंधारे गाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 03:50 IST

आढी गवळवाडीत कृषी विभागाने बांधलेले बंधारे मातीच्या गाळाने रुतले गेले आहेत, तर एक बंधारा कोसळून गेला आहे. लाखो रुपये खर्च करूनदेखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दरवर्षी उद्भवत आहे.

- सिकंदर अनवारेदासगाव  - आढी गवळवाडीत कृषी विभागाने बांधलेले बंधारे मातीच्या गाळाने रुतले गेले आहेत, तर एक बंधारा कोसळून गेला आहे. लाखो रुपये खर्च करूनदेखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दरवर्षी उद्भवत आहे. ज्या विहिरीवर पिण्याच्या पाण्याची सुविधा होती ती विहीर वर्षभर पडक्या अवस्थेत असून दुरुस्तीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.महाड तालुक्यातील आढी गावात कृषी विभागाने, ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ माध्यमातून पाणलोटमधून बंधारे बांधले खरे; पण हे सर्व बंधारे मातीच्या गाळाने भरले आहेत. गावाजवळ असलेल्या एका ओढ्यावर कृषी विभागाने वर्षभरापूर्वी जवळपास तीन बंधारे बांधले आहेत. हे काँक्रीटचे बंधारे मातीने भरून गेले तर काही बंधारे कोसळून गेले आहेत. यामुळे मुख्य उद्देश या ठिकाणी सफल झाला नसल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी दोन विहिरी आहेत. यातील एक विहीर वर्षभरापूर्वी कोसळली आहे. मात्र, ग्रामपंचायतीने ही विहीर अद्याप दुरुस्त केलेली नाही. यामुळे विहिरीत पाणी असूनदेखील वापर करता येत नसल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. शिवाय, या विहिरीतील पाणी मे अखेरपर्यंत पिण्यास मिळत असल्याने या विहिरीची दुुरुस्ती आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.सद्यस्थितीत वाडीजवळ असलेल्या एका विहिरीतील पाणी ग्रामस्थांना आणावे लागत आहे. मात्र, हे पाणी फार काळ टिकून राहत नाही. यामुळे आतपासूनच बैलगाडीवर छोटे पिंप टाकून पिण्याचे पााणी आणण्याचे काम येथील तरुण करत आहेत. स्वदेस संस्थेने गावात नळपाणी पुरवठा योजना राबविली आहे. मात्र, या योजनेवर पाणी कमी असल्याने दोन दिवसांनी नळाला पाणी येत असल्याचे आशा कांबळे यांनी सांगितले. सध्या तरी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याकरिता पायपीट करावी लागते.भौगोलिक स्थिती पाहून गवळीवाडीचा वीर ग्रा. पं. मध्ये समावेश करावातालुक्यातील आढी गाव हे डोंगरावर वसले आहे. या गावाकडे जाणारा मार्ग लोणेरे गोरेगावमधून आहे. वीर गावापासून आढी गावाची गवळीवाडी फक्त एक ते दीड किमी अंतरावर आले. येथून आढी गावात जायचे असेल तर एक तासाची पायपीट करून गावात जावे लागते. आढी गवळीवाडीला रस्तादेखील वीर गावातूनच आहे. जेमतेम २० ते २५ घरांच्या वाडीत ग्रामस्थांना एखाद्या दाखल्याकरिता मात्र तासाभराची पायपीट किंवा लोणेरे मार्गे उलटा प्रवास करावा लागत आहे. यामुळे वाडीचा समावेश वीर ग्रामपंचायतीत करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Raigadरायगड