शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

घराचे बांधकाम करणे झाले महाग, भाव वाढल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 00:56 IST

Raigad : २०१६ मध्ये नोटबंदी झाल्यापासून ते आजवर विविध कारणांमुळे बांधकाम उद्योगावर मंदीचे सावट आहे. टाळेबंदीनंतर ही वाढ १० ते १२ टक्के इतकी आहे, तर स्टीलच्या दरात सर्वाधिक १५ ते २० टक्के वाढ झाली आहे.

अलिबाग :  कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदी व संचारबंदीमळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. यामध्ये बांधकाम उद्योग ही सुटलेला नाही. सिमेंट, वाळू, वीट व स्टील आदी साहित्याच्या किमती वाढल्याने बांधकाम खर्चही वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घर बांधण्याचे बजेट पुरते कोलमडले आहे.२०१६ मध्ये नोटबंदी झाल्यापासून ते आजवर विविध कारणांमुळे बांधकाम उद्योगावर मंदीचे सावट आहे. टाळेबंदीनंतर ही वाढ १० ते १२ टक्के इतकी आहे, तर स्टीलच्या दरात सर्वाधिक १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने सुरू असलेले, अनेक प्रकल्प बंद पडले आहेत. टाळेबंदीपूर्वी अनेक प्रकल्प प्रस्तावित होते.  रायगड जिल्ह्यात विकासकांनी गृहप्रकल्पाची घोषणा करून, त्यावेळच्या दरानुसार नोंदणी केली होती, परंतु कोरोनामुळे सध्या कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे बांधकाम खर्चही वाढला आहे. कोरोनामुळे सध्या कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे बांधकाम खर्चही वाढला आहे. अशा परिस्थितीत त्याच दराने घराची विक्री करणे विकासकांना शक्य नसल्याने, अनेकांनी ग्राहकांकडे जास्त रकमेची मागणी केल्याची उदाहरणे आहेत. टाळेबंदीच्या काळात वाहतूक बंद होती. त्यामुळे इतर राज्यांतून पुरेसा कच्चा माल उपलब्ध झाला नाही. सरकारची परवानगी नसल्यामुळे मागील काही वर्षांपासून दगडखाणी बंद आहेत. त्यामुळे खडी, गिट्टी, दगडी, गोठळी, रेजगा आदी पुरवठाही कमी झाला आहे.  यातच किमती वाढल्याने अनेक व्यावसायिकांनी कच्च्या मालाचा मर्यादित साठा करून ठेवला आहे.  यामुळे  बांधकाम व्यवसायिक संकटात सापडले आहेत.

 बांधकाम साहित्याचे दर का वाढले?संचारबंदी व टाळेबंदीत सर्वच व्यवसाय बंद होते. वाहतूक यंत्रणाही बंद होत्या. या काळात मजुरांनी घरचा रस्ता धरल्याने बांधकाम साहित्याच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला. आता अनलॉकमध्येही पुरेसे मजूर उपलब्ध नाहीत. त्यामुळे कच्च्या मालाचे उत्पादन घटले आहे.

लाॅकडाऊनच्या काळात मजूर मिळत नव्हते. याचा सर्वात जास्त परिणाम उत्पादनावर झाला. त्यामुळे वाळू, सिमेंट, वीट, ग्रीटचे दर वाढले आहेत. कच्या मालाला मागणी असली, तरी साठा मर्यादित आहे, तर पुढील काही महिने अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.- रणजीत म्हात्रे, बांधकाम साहित्यविक्रेता

टॅग्स :Raigadरायगड