शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

इमारत तोडताना जेसीबीवर कोसळली; एक जखमी, नडगाव ग्रामपंचायत इमारतीबाबतची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 00:26 IST

Raigad : महाड तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या नडगावतर्फे बिरवाडी ग्रामपंचायतीची इमारत मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात जात असल्याने, ग्रामपंचायत कार्यालयाने सदर इमारत तोडण्यासाठी निविदा काढली होती.

दासगाव : महाड औद्योगिक क्षेत्रातील नडगाव ग्रामपंचायत इमारतीचे काम तोडत असताना इमारत तोडकाम करणाऱ्या जेसीबीवर सोमवारी कोसळली. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जेसीबी चालकाला तब्बल तासाभराने बाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या चालकाला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. समशेर अन्सारी असे या गंभीररीत्या जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे.महाड तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या नडगावतर्फे बिरवाडी ग्रामपंचायतीची इमारत मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात जात असल्याने, ग्रामपंचायत कार्यालयाने सदर इमारत तोडण्यासाठी निविदा काढली होती. त्यानुसार, इमारत तोडायला संबंधित ठेकेदाराने सुरुवात केली होती. इमारतीचा बहुतांश भाग तोडून झाल्यानंतर सोमवारी दुपारी समोरील भाग तोडत असताना जिन्याचा भाग जेसीबी यंत्रावर कोसळला. जेसीबीच्या केबिनचा भाग चेपला गेल्याने आतील चालक गंभीर जखमी झाला. चालकाचा अडकलेला पाय सोडविण्यासाठी तब्बल एक तास लागला. गंभीररीत्या जखमी झालेल्या जेसीबी चालकाला बाहेर काढण्यासाठी महाड औद्योगिक पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले. चालकाला बाहेर काढून तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या वेळी सुदैवाने अन्य कोणीही या ठिकाणी उपस्थित नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. याबाबत ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

सुरक्षेचे नियम बसविले धाब्यावर मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामात नडगाव ग्रामपंचायत इमारत बाधित होत असल्याने, नवीन इमारतीचे अन्य ठिकाणी बांधकाम केले जाणार आहे. तत्पूर्वी ही इमारत जमीनदोस्त करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाने १ लाख ७५ हजार रुपयांची एक निविदा काढली होती. 

ठेकेदाराचे अक्षम्य दुर्लक्षत्यानुसार, हे काम ठेकेदाराने घेतले होते. हे काम करत असताना सुरक्षेचे नियम पायदळी तुडवल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेच्या वेळी सुदैवाने अन्य कोणीही या ठिकाणी उपस्थित नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

टॅग्स :Raigadरायगड