शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या विकासासाठी २७० कोटींचा आराखडा;पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 23:33 IST

विकासकामांचे प्रस्ताव आठ दिवसांत सादर करावेत आणि कामे नियोजित वेळेतच पूर्ण करावीत, असे स्पष्ट आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलताना दिले आहेत.

अलिबाग : जिल्हा वार्षिक योजनेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता प्राप्त निधीतून व मर्यादित कालावधीत कामे पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी काटेकोर नियोजन करावे, विकासकामांचे प्रस्ताव आठ दिवसांत सादर करावेत आणि कामे नियोजित वेळेतच पूर्ण करावीत, असे स्पष्ट आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलताना दिले आहेत.जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर सर्व सदस्यांनी एकमताने काम करावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले. ज्या यंत्रणांचा निधी खर्च न होता शासनास समर्पित होईल, अशा यंत्रणांच्या प्रमुखांवर कारवाई करण्यात येईल, असे निर्देशही पालकमंत्री चव्हाण यांनी या वेळी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चव्हाण होते. ते म्हणाले, २०१८-१९ साठी रायगड जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजनेअंतर्गत १८९ कोटी १७ लाख रु पये, विशेष घटक योजनेअंतर्गत २४ कोटी ९४ लाख रु पये व आदिवासी उपयोजनेसाठी ५५ कोटी ९५ लाख असा एकूण २७० कोटीरु पयांचा आराखडा आहे. निधी खर्च करून जिल्ह्यातील विकासकामे करावयाची आहेत. त्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक कालावधी लक्षात घेता खूप कमी कालावधी उपलब्ध होईल, त्या दृष्टीने नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.बैठकीत झालेल्या चर्चेत जिल्ह्यातील कचºयाची समस्या मार्गी लावण्यासाठी तालुकानिहायकचरा प्रक्रिया प्रकल्प राबविण्यासंदर्भात, तसेच नव्याने निर्माण होत असलेल्या नागरी वसाहतींमधील सांडपाण्याच्या प्रश्नाबाबतही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकाºयांची समिती पाहणी करून अभ्यास करतील. त्यानंतर या बाबत निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, विधानपरिषद सदस्य आ. निरंजन डावखरे, आ. बाळाराम पाटील, आ. अनिकेत तटकरे, विधानसभा सदस्य आ. सुरेश लाड, सिडको अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, आ. भरत गोगावले, आ. सुभाष उर्फ पंडित पाटील, आ. मनोहर भोईर, आ. धैर्यशील पाटील, जि.प. उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील तसेच जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी, तर आभारप्रदर्शन जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी केले.

टॅग्स :Raigadरायगड