शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बलाप येथील के .टी. बंधाऱ्याला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 03:06 IST

सुधागड तालुक्यातील बलाप येथे अंबा नदीपात्रातील पाटबंधारे विभागाच्या के.टी. बंधाºयातून शेकडो लिटर पाण्याची गळती होत आहे.

- विनोद भोईर पाली : सुधागड तालुक्यातील बलाप येथे अंबा नदीपात्रातील पाटबंधारे विभागाच्या के.टी. बंधा-यातून शेकडो लिटर पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे यावर्षी सुधागडवासीयांवर पाणीटंचाईचे संकट येणार असल्याचे चित्र दिसते. या के.टी. बंधाºयाचे काही महिन्यापूर्वी दुरुस्तीकाम करण्यात आले होते. दुरु स्ती करूनही या बंधाºयातून दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. जर असेच पाणी वाया जात राहिले तर एप्रिल व मे महिन्यात रासळ, अंबोले, पाली, कुंभारशेत खवली या सर्व गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पाटबंधारे अधिकाºयांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.या बंधाºयाची दुरवस्था झाली असून या बंधाºयाचे स्लॅब जागोजागी पडले आहे. काही ठिकाणी स्लॅब पडल्याने लाकडी फळी टाकण्यात आली आहे. पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीकडे पाटबंधारे विभागातील अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसते. या बंधाºयाच्या पाण्यावर रासळ, अंबोले, पाली येथील मोठमोठ्या पाण्याच्या योजना या के.टी.बंधाºयावर अवलंबून आहेत. अनेक गावे या पाण्यावर अवलंबून आहे. या बंधाºयाच्या पाण्याचा सुधागडातील औद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांना उपयोग होतो. त्यामुळे या बंधाºयातून होणारी पाणीगळती तातडीने थांबली पाहिजे अशीही मागणी होत आहे. या बंधाºयाचा फायदा प्रामुख्याने रासळ, अंबोले, कुंभारशेत पाली आदी गावांच्या शेतीसाठी व पिण्यासाठी होतो. अंबा नदीच्या पात्रात बलाप येथे असणाºया पाटबंधारे विभागाच्या के.टी. बंधाºयाची दुरु स्ती के ली मात्र पुन्हा पाणीगळती होत असल्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. तेव्हा पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन गळती थांबवावी अशी मागणी होत आहे.>बलाप येथील के.टी.बंधाºयातून शेकडो लिटर दररोज गळती होत आहे. या बंधाºयाची काही महिन्यापूर्वी दुरु स्ती केली होती. मात्र पुन्हा गळती होत असल्याने लक्ष देणे गरजेचे आहे.- पी.सी.पालकर, भाजपा, पाली शहराध्यक्षंआम्ही कुंभारशेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाटबंधारे विभाग कोलाड येथील कार्यालयाला बलाप येथील के.टी बंधाºयातून होणारी पाणी गळती थांबविण्याबाबत लेखी पत्र दिले आहे.- राजेंद्र खिरवले, उपसरपंच, कुंभारशेत ग्रामपंचायत