शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

पाली शहरात बीएसएनएलची इंटरनेट सेवा कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 00:34 IST

नागरिक संतप्त । पाली पोस्ट कार्यालयातील काम ठप्प, खातेदारांची गैरसोय

विनोद भोईर 

पाली : सुधागड तालुक्यातील पाली शहरात असलेल्या बीएसएनएलच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्याने बीएसएनएलच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याने सेवेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे पाली पोस्ट कार्यालयातील कामकाज मागील अनेक दिवसांपासून बंद असल्याने ग्राहकांना सतत फेºया माराव्या लागत असल्याने खातेधारकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे.पोस्टात ज्येष्ठ नागरिक आपले महिन्याचे व्याज घेण्यासाठी येत असतात. तसेच स्पीडपोस्ट, रजिस्टर पत्रे पाठविण्यासाठी, टेलिफोन बिले भरण्यासाठी, पोस्टल लाइफ इन्शुरन्सचा विमा भरण्यासाठीही लोक येतात. या सर्व सेवांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. सर्वच उप-टपाल कार्यालयात (सब पोस्ट आॅफिस) अपुरा कर्मचारी वर्ग व संथगतीने चालणाºया इंटरनेटमुळे गेले महिनाभर नागरिकांची कामे खोळंबली आहेत. यामुळे पोस्टात येणाºया नागरिकांचे हाल होत आहेत. पोस्ट आॅफिस कार्यालयांमध्ये कर्मचारी वाढवावेत, यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, तसेच समस्यांचे निराकरण करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

अगोदर पोस्ट आॅफिसमध्ये ‘संचय पोस्ट’ हे कम्प्युटर सॉफ्टवेअर सुरू होते. मात्र, त्यानंतर कोअर बँकिंग प्रणाली सुरू करण्यात आली असून, नवीन सॉफ्टवेअरवर पोस्ट कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. इंटरनेटवर सर्व माहिती टाकून वापर सुरू झाल्याने समस्या निर्माण झाल्याचे पोस्ट कर्मचाºयानी सांगितले. बीएसएनएलचे इंटरनेट कनेक्शन येथे आहे. हे नेट अनेकदा संथगतीने चालते, तर बहुतांश वेळा नेट बंद झाल्याने पूर्णपणे कामे खोळंबतात. कोअर बँकिंगचे पिनॅकल हे सॉफ्टवेअर वापरले जात आहे.नवीन सॉफ्टवेअर व कमी मनुष्यबळामुळे समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. बीएसएनएलचे नेट सतत बंद पडत असेल, तर पोस्ट विभागाने पर्यायी खासगी नेट घ्यायला हवे. गैरसोय का करता, ज्येष्ठ नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे संतप्त नागरिकांनी सांगितले.ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय1गेल्या अनेक दिवसांपासून आमचे व्याजाचे पैसे मिळत नाहीत व इतर आर्थिक व्यवहाराची कामे पूर्ण होत नाहीत. नेट बंद आहे असे उत्तर दिले जाते. ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला व्याजाचे पैसे घ्यायला पोस्टात जावे लागते. वेळेवर पैसे मिळाले नाहीत तर ज्येष्ठांच्या महिन्याचे वेळापत्रक कोलमडून जाते. अंथरुणाला खिळलेले ज्येष्ठ नागरिक दुसºया व्यक्तीला पैसे घेण्यासाठी पोस्टात पाठवतात. मात्र, अशा गोंधळामुळे ज्येष्ठांना वेळेवर पेसे मिळत नाहीत, असे खातेदारांनी सांगितले. पोस्टाच्या या गोंधळामुळे खातेदारांची सहनशीलता संपली आहे. आता आंदोलन करण्याचा इशारा काहींनी दिला आहे.स्पीड पोस्ट जाणे बंद2स्पीड पोस्ट वेळेत जाणे आवश्यक आहे. मात्र, पोस्ट आॅफिसमध्ये कम्प्युटर बंद असल्याने स्पीड पोस्ट जाणेही बंद आहेत. वीजपुरवठा खंडित झाला की, पोस्टातील कामावर परिणाम होतो. इंटरनेट व कम्प्युटरवर जी कामे अवलंबून आहेत ती सर्व कामे बंद होतात. पोस्टाचे एजंटही या सर्वप्रकाराला कंटाळले आहेत. एजंटकडे जमा झालेले खातेधारकांचे लाखो रुपयांचे चेक पोस्टात जमा होऊ शकलेले नाहीत. नवीन खाती उघडली जात नाहीत. पोस्ट कार्यालयात दुरवस्था झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची किंवा पिण्याच्या पाण्याची सोय नाही.माझी आई खूप आजारी आहे. तिला पुढील उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात घेऊन जायचे आहे, त्याकरिता मी माझे पोस्टातील खात्यावरील पैसे काढण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून पाली पोस्ट कार्यालयात फेºया मारत आहे. मात्र, तेथील अधिकारी नेट नसल्याचे कारण सांगत आम्हाला परत पाठवीत आहेत. स्वकष्टाचे पैसे असूनही उपचारासाठी मिळत नसल्याने मनस्तापही सहन करावा लागत आहे.- शीला गायकवाड, नाडसूरजानेवारी महिन्यापासून पाली पोस्ट आॅफिसमधील बीएसएनएलची इंटरनेट सेवा कधी संथगतीने सुरू असते तर कधी कधी पूर्णत: बंद. अनेकदा त्यांच्या कार्यालयात लेखी तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे. पर्यायी नेटवर्क वापरतो त्याचा राउटर खराब झाला आहे. त्याची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे केली असून लवकरच व्यवस्था होईल.- एम. पी. कोनकर, उप डाकपाल, पाली कार्यालयगेले महिनाभर पाली पोस्ट आॅफिसमध्ये बीएसएनएलची इंटरनेट सेवा कधी सुरू तर कधी बंद, अशा अवस्थेत असल्याने ग्राहकांना रोज फेºया माराव्या लागत आहेत. त्याचा नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने ज्या दिवशी नेटवर्किंग बंद असेल, त्या दिवशी आॅफ लाइन कामकाज करून जुन्या पद्धतीने स्लीपवर व्यवहार करण्यात यावा, अशी मागणी ग्राहकांची आहे.- किरण राऊत, शिवसैनिक

टॅग्स :RaigadरायगडBSNLबीएसएनएल