शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

बीएसएनएलची केबल तुटल्याने अलिबागमध्ये व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 06:54 IST

जिल्ह्यातील बहुतांश भागात गेल्या चार दिवसांपासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प राहिल्याने ३१ मार्च या आर्थिक वर्षाअखेरच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील बँकांच्या व्यवहारांवर विपरित परिणाम झाला, तर सोमवार सकाळपासून अलिबागमध्ये बीएसएनएलच्या कॉपर केबलला फॉल्ट आल्याने शहरातील तब्बल

- जयंत धुळपअलिबाग  - जिल्ह्यातील बहुतांश भागात गेल्या चार दिवसांपासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प राहिल्याने ३१ मार्च या आर्थिक वर्षाअखेरच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील बँकांच्या व्यवहारांवर विपरित परिणाम झाला, तर सोमवार सकाळपासून अलिबागमध्ये बीएसएनएलच्या कॉपर केबलला फॉल्ट आल्याने शहरातील तब्बल १२०० लँडलाइन फोन बंद पडले. शिवाय इंटरनेट सेवाही पूर्णपणे ठप्प झाली आहे. बंद पडलेली लँड लाइन सेवा पूर्ववत सुरू होवून इंटरनेट सेवा उपलब्ध होण्यास दोन दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे बीएसएनएलच्या सूत्रांनी सांगितले.दरम्यान, सोमवारी आर्थिक वर्षाअखेरच्या अंतर्गत कामकाजासाठी खातेदारांचे आर्थिक व्यवहार बँकांनी बंद ठेवले असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर बीएसएनएल इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने बँकाना अंतर्गत कामेही न झाल्याने बँक अधिकारी देखील नाराजी व्यक्त करीत होते. दरम्यान, अनेक एटीएम व कॅश डिपॉझिट मशिन्स बंद पडल्याने आर्थिक व्यवहार करता न आल्याने खातेदारांनी संताप व्यक्त केला.अलिबाग शहरातील बँकांच्या बीएसएनएल लीज लाइन्स सोमवारी संध्याकाळपर्यंत पूर्ववत सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे बीएसएनएलच्या सूत्रांनी सांगितले. लीज लाइन्स सुरू झाल्यास संध्याकाळी एटीएम सेवा सुरू होवू शकेल, असेही सांगण्यात येत आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएलRaigadरायगड