शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

उमरठ येथे वधूने घेतली स्वच्छतेची शपथ

By admin | Updated: May 3, 2016 00:53 IST

लग्नामध्ये वधू-वर अग्नीला साक्षी ठेवून सात फेरे घेतात. प्रत्येक फेरीमध्ये वचन, शपथ घेण्याची प्रथा, परंपरा आहे. याच घेतलेल्या आणाभाका त्यांना आयुष्याच्या प्रत्येक क्षणी उपयोगी

- आविष्कार देसाई, अलिबाग

लग्नामध्ये वधू-वर अग्नीला साक्षी ठेवून सात फेरे घेतात. प्रत्येक फेरीमध्ये वचन, शपथ घेण्याची प्रथा, परंपरा आहे. याच घेतलेल्या आणाभाका त्यांना आयुष्याच्या प्रत्येक क्षणी उपयोगी पडतात, परंतु या सात शपथेव्यतिरिक्त आठवी शपथ आयुष्यात महत्त्वाची असल्याचे वधूने दाखवून दिले. पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथील लग्न सोहळ््यात वधूने स्वच्छतेची आठवी शपथ घेऊन सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला. पोलादपूर तालुक्यातील उमरठ हे गाव तानाजी मालसुरे यांचे जन्म गाव आहे. ही ग्रामपंचायत हागणदारीमुक्त झाली त्याचा जल्लोष थेट लग्न मंडपात करुन स्वच्छतेचा नवा पायंडा पाडला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य उत्तम कोळंबे यांनी वधूला अहेरामध्ये शौचालय बांधून देण्याचे आश्वासन दिले. वधूनी स्वच्छतेबाबत जागरूक राहावे अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने २५ एप्रिलच्या अंकात प्रसिध्द केले होते. ते वृत्त वाचून स्वच्छतेबाबतची जागरूकता वाढत असल्याचे या निमित्ताने अधोरेखित होते. रायगड जिल्ह्यामध्ये स्वच्छ भारत मिशन जोमाने राबविण्यात येत आहे. समाजामध्ये स्वच्छतेबाबत होणारी जागृती पाणी व स्वच्छता मिशन विभागाच्या पथ्यावर पडत असल्याचे चित्र आहे. २०१९ सालापर्यंत रायगड जिल्ह्याला हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रतिवर्षी सुमारे तीस हजार वैयक्तिक शौचालये निर्माण करावी लागणार आहेत. उमरठ गावातील ग्रामस्थ नामदेव कळंबे यांची मुलगी सुप्रिया हिने स्वत:च्या लग्न सोहळ््यात स्वच्छतेची शपथ घेतली. लग्न सोहळ््यासाठी आलेल्या उमरठ, रामाचे उमरठ, गोवले, खोपट, बोरज, साखर, करंजे, लहुळसा, मोरसडे यासह अन्य गावातील सुमारे ५०० उपस्थितांनाही तिने स्वच्छतेची शपथ दिली.ग्रामपंचायतीमार्फत सुप्रिया हिच्या सासरी शौचालय बांधून देण्यात येईल, असे जिल्हा परिषद सदस्य उत्तम कोळंबे यांनी सांगितले. स्वच्छतेची सवय महत्त्वाची- के वळ टार्गेट पूर्ण न करता समाजाला स्वच्छतेची सवय लागणे महत्त्वाचे आहे. पाणी व स्वच्छता मिशनचे सुरु असलेले कार्य समाजापर्यंत पोचत असल्याचे लग्न सोहळ््यातील कृतीवरुन समोर आल्याचे जिल्हा परिषद सदस्य उत्तम कोळंबे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड, संवाद तज्ज्ञ सुरेश पाटील, उमरठ सरपंच विमल कळंबे, उपसरपंच इंद्रजित कळंबे, एम.एस.पोतकुले, ज्ञानेश्वर भिलारे यांच्यासह अन्य पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.