आविष्कार देसाई, अलिबागरायगड जिल्हा परिषदेमध्ये सत्ता बदलाचे वारे वाहत असल्याच्या वावड्या सातत्याने उठत आहेत. मात्र सध्या कोणताही फेरबदल होणार नसल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शनिवारी दिले. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ता संघर्षाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न तटकरे यांनी रविवारी सुतारवाडी येथे बोलावलेल्या बैठकीत केल्याचे बोलले जाते.सध्या रायगड जिल्हा परिषदेमध्ये शेकाप आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. राष्ट्रवादीचे सुरेश टोकरे हे अध्यक्ष, तर उपाध्यक्षपदी शेकापचे अरविंद म्हात्रे विराजमान आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना अवघा एखाद वर्षाचा कालावधी उरलेला आहे. त्यामुळे सत्ते बाहेर असलेल्या शिवसेनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापच्या नाराज सदस्यांची मोट बांधण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून होत आहेत. सुरेश टोकरे यांना अध्यक्षपदासाठी दीड वर्षाचा कालावधी दिला असून उरलेला दीड वर्षासाठी तटकरेंनी शब्द दिला असल्याचे राष्ट्रवादीचे शामकांत भोकरे हे जाहीरपणे बोलत आहेत. त्यामुळे सत्ता बदलाला वाव असल्याचे दिसून येत होते.मुदत संपण्याच्या शेवटच्या टर्ममध्ये सत्तांतर आणि पदांची लालसा सर्वांनाच सतावत आहे. त्यामुळे तटकरे यांनी निर्णय घेण्यासाठी सुतारवाडी येथील कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांची आणि पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. सर्वांनी परखड मते मांडण्याच्या सूचना तटकरे यांनी सर्वांना केल्या.
जिल्हा परिषदेत सत्ता संघर्षाला विराम
By admin | Updated: February 29, 2016 01:56 IST