शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सीआरझेडमुळे विकास प्रकल्पांना खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:50 IST

केंद्र शासनाच्या सुधारित सीआरझेड कायद्यामुळे सिडकोला आपल्या ताब्यातील तब्बल १२४0 हेक्टर जमिनीवर पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे अनेक विकास प्रकल्पांना खीळ बसली आहे.

कमलाकर कांबळे।नवी मुंबई : केंद्र शासनाच्या सुधारित सीआरझेड कायद्यामुळे सिडकोला आपल्या ताब्यातील तब्बल १२४0 हेक्टर जमिनीवर पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे अनेक विकास प्रकल्पांना खीळ बसली आहे. त्यामुळे शहराच्या विकासाला बसलेला सीआरझेडचा पाश शिथिल करावा, यादृष्टीने सिडकोचा केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे; परंतु सहा वर्षे झाली तरी यासंदर्भात सकारात्मक निर्णय होत नसल्याने सिडकोची मोठी पंचाईत झाली आहे.केंद्र शासनाच्या १९९१च्या सीआरझेड (सागरी किनारा नियंत्रण क्षेत्र) कायद्याच्या अधीन राहून सिडकोने खाडी किनाºयालगतच्या संपादित जमिनीवर अनेक विकास प्रकल्प उभारले, तर काही प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र, २0११मध्ये सीआरझेड कायद्यात सुधारणा करून तो अधिक कडक करण्यात आला. या सुधारित कायद्यान्वये सीआरझेडच्या क्षेत्र मर्यादेत वाढ झाल्याने पूर्वी झालेले आणि मागील काळात प्रस्तावित करण्यात आलेले अनेक विकास प्रकल्प अडचणीत सापडले आहेत. सिडकोने विविध प्रयोजनासाठी राखून ठेवलेली तब्बल १२४0 हेक्टर जमीन सीआरझेडच्या कचाट्यात सापडली आहे. आजच्या बाजारभावाप्रमाणे या जमिनीची किंमत ४५ हजार कोटींच्या घरात आहे. विशेष म्हणजे, सिडकोकडे आता फारशी शिल्लक जमीन नाही. पुढील नियोजनाची सर्व मदार सीआरझेडच्या कचाट्यात अडकलेल्या या भूखंडांवर असल्याने हा कायदा शिथिल करावा, अशी सिडकोची मागणी आहे. त्यासाठी सिडकोच्या वतीने केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी यासाठी केंद्राकडे साकडे घातले होते. तसेच विद्यमान व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी हेसुद्धा यासंदर्भात पाठपुरावा करीत आहेत; परंतु लालफितीच्या कारभारामुळे हा प्रश्न जैसे थे राहिल्याने सिडकोच्या माध्यमातून राबविल्या जाणाºया विकास प्रकल्पांना खीळ बसली आहे. मागील तीन वर्षांपासून केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार आहे. इतकेच नव्हे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोच्या रखडलेल्या प्रकल्पांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वेळोवेळी सूतोवाच केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयाने नवी मुंबईत लागू करण्यात आलेला सीआरझेड कायदा शिथिल करावा, अशी सिडकोची आग्रही मागणी आहे. दरम्यान, यासंदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता,होऊ शकला नाही.