शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बोर्लीपंचतन विभाग अंधारात; म्हसळा ते गोनघर आठ विद्युत खांब पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 02:35 IST

श्रीवर्धन तालुक्यात काल रात्रीपासून पावसाने जोर पकडला आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सायंकाळी पावसाच्या सरी जोरात सुरू झाल्यावर बुधवारी दुपारी गोनघरमध्ये वादळी पावसाने थैमान घातले.

श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यात काल रात्रीपासून पावसाने जोर पकडला आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सायंकाळी पावसाच्या सरी जोरात सुरू झाल्यावर बुधवारी दुपारी गोनघरमध्ये वादळी पावसाने थैमान घातले. पावसाचा जोर व वादळी वारे यामुळे म्हसळा ते गोनघर रस्त्यावरील विद्युत महामंडळाचे २२ केव्ही उच्चदाब वाहिनीचे आठ खांब पडले आहेत. त्या कारणाने विद्युत महामंडळाच्या बोर्लीपंचतन विभागाअंतर्गत येणाऱ्या बोर्ली, दिवेआगर, वडवली, भावे, कुडकी, शिस्ते, कापोली, वेळास, आदगाव, सर्वा, हरवीत, कुडगाव, दिघी, नानवेल या गावांचा विद्युत पुरवठा बंद पडला आहे. विद्युत महामंडळाच्या कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. सदर वादळात कुठल्याही स्वरूपाची जीवित हानी झालेली नाही.वादळी पावसामुळे विद्युत महामंडळाचे जवळपास आठ खांब जमीनदोस्त झाले आहेत. उद्या सकाळी दुरुस्तीला सुरुवात केली जाईल. दोन दिवसात विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.- महेंद्र वाकपंैजण, अभियंता,विद्युत महामंडळ श्रीवर्धनकालपासून पावसाचे प्रमाण जास्त आहे. आज गोनघरजवळ विद्युत महामंडळाचे खांब पडले त्या व्यतिरिक्त कुठे नुकसान झालेले नाही. नैसर्गिक आपत्ती प्रसंगी जनतेच्या सुरक्षेसंदर्भात पोलीस प्रशासन संवेदनशील आहे.- धर्मराज सोनके, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोर्लीपंचतनवादळी पावसाने विद्युत महामंडळाचे खांब पडले आहेत. त्यामुळे आमच्याकडील विद्युत पुरवठा बंद पडला आहे. विद्युत महामंडळाने लवकरात लवकर विद्युत पुरवठा पूर्ववत करावा. जीर्ण खांब अगोदरच काढले असते तर आज ही चांगले खांब वादळात पडले नसते. पावसाळा सुरू झाल्यापासून विजेचा सारखा लपंडाव चालू आहे.- धवल तवसाळकर, ग्रामस्थ वेळास

टॅग्स :Raigadरायगड