शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बूमची सक्ती मच्छीमारांच्या मुळावर

By admin | Updated: December 9, 2015 00:57 IST

मासळी व्यावसायिक आणि खलाशांमध्ये चार महिन्यांपासून पावर ब्लॉकवरुन (बूम) सुरु असलेला वाद ठरावीक खलाशांच्या आडमुठ्या धोरणामुळे आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.

मधुकर ठाकूर,  उरणमासळी व्यावसायिक आणि खलाशांमध्ये चार महिन्यांपासून पावर ब्लॉकवरुन (बूम) सुरु असलेला वाद ठरावीक खलाशांच्या आडमुठ्या धोरणामुळे आणखीन चिघळण्याची शक्यता आहे. दोघांच्या वादामुळे मासळी व्यवसायावर परिणाम होत आहे. खलाशीवर्गाच्या बूमच्या हट्टापायी मासेमारीचा महत्त्वाचा हंगाम वाया गेल्याने मासळी व्यावसायिकांबरोबरच सप्लायर्स, निर्यातदार, छोटे-मोठे व्यावसायिक त्यावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट आहे. बूमच्या वादात ससून डॉक बंदरात पर्ससीन नेट मासेमारी व्यवसाय करणाऱ्या ४०० मच्छीमार बोटींपैकी जवळपास २०० मच्छीमार बोटी किनाऱ्यावर नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. अद्ययावत यांत्रिक बूमद्वारे मासेमारी केल्याने मासळीचे उत्पादन कमी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बहुतांश मासळी व्यावसायिकांनी पारंपरिक मासळी व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी पावर ब्लॉक यंत्रणा न बसविण्याचा निर्णय घेतला आहे. दुखावलेल्या खलाशीवर्गाने असहकार करत बूम नाही तर काम नाही अशी ताठर भूमिका घेतली आहे. पर्ससीन नेट मासेमारी बंद पडल्याने चार महिन्यात सुमारे अडीचशे कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. दुसरीकडे मुंबई-रायगडमधील सुमारे ३३ पर्ससीन नेट मासेमारी बोट मालकांनी बोटींवर अद्ययावत यांत्रिक बूम बसवून बिनदिक्कतपणे मासेमारी सुरू केली आहेत. ससून डॉक, मिरकरवाडा, श्रीवर्धन, विजयदुर्ग आणि सातपाटी याच बंदरात पर्ससीन नेट व्यावसायिकांना मासळी उतरविण्याची परवानगी आहे. मात्र यांत्रिक बूमचा वापर करुन पर्ससीन नेट व्यावसायिक पकडलेली मासळी स्थानिक बंदर आणि मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांना हाताशी धरीत जांभारी-जयगड, चिंचबंदर, रेवदंडा, जंगल जेट्टी दिघी, आगरदांडा, रत्नागिरी आणि त्यामधील छोट्या-छोट्या बंदरात बेकायदेशीरपणे उतरवित आहेत आणि मिळेल त्या भावात विक्री करीत आहेत. सुरक्षा यंत्रणेला हाताशी धरुन काही बूमधारक मासळी व्यावसायिक रात्रीच्यावेळी ओएनजीसीच्या रिंगजवळ जावून मासेमारी करीत आहेत. खोल समुद्रात सुरु असलेल्या मासेमारीमुळे ओएनजीसीलाच गंभीर धोका निर्माण झाला आहे. यांत्रिक बूमद्वारे करण्यात येणाऱ्या मासेमारीमुळे मासळी उत्पादनही कमी होत असल्याची भीती व्यावसायिकांकडून व्यक्त होवू लागली आहे.