शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मुरुडमध्ये पावसामुळे बोटी किनाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 00:31 IST

मच्छीमारांना आर्थिक फटका; मासेमारीला गेलेल्या बोटी परतल्या 

लोकमत न्यूज नेटवर्क मुरुड : गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. शुक्रवारी पहाटेपासून मुरुड तालुक्यात पावसाची सुरुवात झाली. किमान चार तास पाऊस पडल्याने सर्वत्र धुके पसरले होते. पाऊस जरी रिमझिम बरसत असला तरी याचा मोठा फटका मच्छीमारांना सहन करावा लागला आहे. ढगाळ वातावरणामुळे काही बोटी किनाऱ्याला शाकारल्या होत्या. परंतु बहुतांश बोटी या खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेल्या होत्या. खोल समुद्रात वारा व पावसाचे प्रमाण वाढताच सर्व बोटींनी किनारा गाठला आहे. आगरदांडा बंदर, राजपुरी बंदर व खोरा बंदरात मोठ्या संख्येने बोटी शाकारण्यात आल्या आहेत.

खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी एका बोटीवर सामान भरण्यासाठी किमान ८० हजार रुपयांपर्यंत खर्च होत असतो. आठ दिवसांचे सामान, सर्व जीवनावश्यक वस्तू भरण्यात येतात. परंतु अचानक अवकाळी पावसाने थैमान घातल्याने मिळालेली मासळी घेऊन सर्व बोटी सुरक्षित किनाऱ्याला आल्या आहेत. या वेळी आमच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष बोट मालकांशी संवाद साधला असता त्यांनी अवकाळी पावसाचा जोर खोल समुद्रात जास्त होता तसेच दाट धुक्यामुळे समोरचे काही दिसत नव्हते, कसाबसा आम्ही किनारा गाठला आहे, असे सांगितले.

सर्व बोटींवर अल्प मासळी मिळाल्यामुळे त्यांचा खर्चसुद्धा निघालेला नाही. मासळी बाजारात मासळी आली, परंतु मासळीचे प्रमाण कमी असल्याने प्रत्यक्षात लिलाव करताना चढ्या भावाने लिलाव घ्यावा लागल्याने मासळी बाजारातसुद्धा मासळीचे दर वाढले होते. सातत्याने पडणारा अवकाळी पाऊस हा कोकणातील मच्छीमारांची डोकेदुखी ठरत आहे. शासनाची कोणतीही मदत मिळत नसतानासुद्धा मच्छीमार आपल्या जीवनाचा गाडा हाकत आहेत.

मच्छीमारी करणे कठीण होत आहे - मनोहर बैलेयाबाबत रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी अवकाळी पाऊस व दाट धुक्यामुळे खोल समुद्रात जाऊनसुद्धा मासळी मिळत नाही. एका बोटीला खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी किमान ७० ते ८० हजार रुपये खर्च येतो त्यामध्ये फक्त १५ ते २० हजार रुपयांची मासळी मिळते. प्रत्येक ट्रिपला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे मच्छीमारी करणे खूप कठीण होत आहे असे सांगितले. अशीच परस्थिती राहिली तर मच्छीमार कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाहीत. शासनाकडून मिळणारी डिझेल परताव्याची रक्कम २०१८ पासून ते आजतागायत मिळालेली नाही, अशी खंत बैले यांनी व्यक्त केली.