शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

मुरुडमध्ये बोटधारकांचे कामबंद आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 23:33 IST

४०० लोकांची मर्यादा ठेवल्याने संताप; जंजिरा किल्ला बंदच राहिल्याने हजारो पर्यटकांची निराशा 

लोकमत न्यूज नेटवर्कमुरुड : रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या आदेशान्वेय ऐतिहासिक जंजिरा किल्ला हा २५ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. ३ जानेवारीपासून सर्व जलवाहतूक सोसायट्यांचे कर्मचारी पर्यटकांना किल्ल्यात नेण्यासाठी सज्ज झाले असतानाच, पुरातत्त्व खात्याकडून दिवसाला ४०० पर्यटकच किल्ल्यात नेले जातील, असा नियम असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत जलवाहतूक करणाऱ्या सर्व सहकारी सोसायट्यांची नाराजी व्यक्त केली आहे, तर बोटधारकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना ने-आण करण्यासाठी पाच सहकारी सोसायट्या असून, प्रत्येक सोसायटीला फक्त ८० पर्यटक नेता येणार असल्याने सर्व बोट मालक व चालकांनी एकत्र येत, जल वाहतूक बंद ठेऊन या निर्णयाचा निषेध केला आहे. किल्ल्यावरील जल वाहतूक बंद ठेवल्याने हजारो पर्यटकांना किल्ला न पाहता परतावे लागले आहे. रविवारची सुट्टी साधून कोल्हापूर, सातारा, पुणे, ठाणे, बोरीवली, भिवंडी आदी भागांतून हजारोंच्या संख्येने पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी आले होते, परंतु जल वाहतूक बंद ठेवल्याने पर्यटकांना हा किल्ला पाहाता आला नाही. यावेळी जल वाहतूक करणाऱ्या सर्व सोसायट्यांमधील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत ४०० संख्येचा निर्बंध रद्द करा, अशी घोषणा करीत, आंदोलनाचा झेंडा फडकवला आहे. बोट मालकांनी आंदोलन पुकारल्याने जंजिरा किल्ला आता किती दिवस बंद राहणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

रोजगाराचा प्रश्न बनला गंभीरमहालक्ष्मी मच्छीमार सहकारी सोसायटीचे चेअरमन विजय गीदी यांनी संचारबंदीच्या काळात लोक घरात बसून राहिल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच पर्यटकांच्या संख्येवर निर्बंध आल्याने आमचे लोक बेकारीचे जीवन जगणार आहेत, असे सांगितले. जंजिरा किल्ल्याचे संरक्षक गोगरे यांनी जंजिरा किल्ल्यावर वाहतूक करणाऱ्या जल वाहतूक सोसायट्यांचे ४०० पर्यटक संख्येवर आक्षेप असल्याने, किल्ला बंद ठेवण्यात आला असल्याचे सांगितले.

किल्ला पाहाण्यासाठी महाराष्ट्रातून खूप दूरवरून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. रोज नवीन नियम लादल्यामुळे पर्यटकांना किल्ला न पाहता परतावे लागल्याने पर्यटकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. काशीद समुद्र किनारी व अन्य समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात गर्दी होते, परंतु तिथे निर्बंध नाहीत, मग जंजिरा किल्ल्यावर निर्बंध का?-हिरकणी गीदी, सरपंच, राजपुरी ग्रामपंचायत

जल वाहतुकीद्वारे सेवा देताना आमचे ११० कर्मचारी इमाने इतबारे सेवा बजावत असतात. संख्येवर निर्बंध ठेवल्याने आमच्या रोजी रोटीचा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी रायगड यांचा आदेश २ जानेवारीपर्यंत असताना, ४०० लोकांची मर्यादा पुढे सुरू ठेवणे हे योग्य नाही.-इस्माईल आदमने, चेअरमन, जंजिरा पर्यटक सहकारी सोसायटी

टॅग्स :fishermanमच्छीमार