शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

आगरदांडा जेट्टीवर प्लॅस्टिक कचरा जमा करणाऱ्या बोट चालकांना तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 01:14 IST

बंदर निरीक्षकांकडून सूचना

मुरुड : तालुक्यातील आगरदांडा जेट्टी परिसरात राजपुरी येथील एका बोटीने मच्छीमारी करताना जाळ्यात अडकलेला प्लॅस्टिक कचरा हा बकेटमध्ये जमा करून खोल समुद्रात टाकण्याच्या तयारी असणाऱ्यांना रोखण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाचे बंदर निरीक्षक यशोधन कुलकर्णी यांनी वेळीच दखल घेतल्याने या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यश आले आहे. त्यामुळे प्लॅस्टिक कचरा खोल समुद्रात टाकण्याचा डाव फसला असून, प्लॅस्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यश प्राप्त झाले आहे.  समाजसेवक व माजी नगरसेवक गिरीश साळी हे आपल्या काही महत्त्वाच्या कामासाठी आगरदांडा जेट्टी येथून दिघीमार्गे श्रीवर्धनला जाणार होते. यावेळी बोटीची प्रतीक्षा करीत असताना त्यांना एक मच्छीमार नौका जेट्टीलगत लागून जाळ्यात अडकलेला प्लॅस्टिकचा कचरा हा बकेटमध्ये जमा करीत असताना दिसले. हे मच्छीमार जाळे खूप मोठे असल्याने या जाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा जमा झाला होता. यावेळी तेथील मच्छीमारांना गिरीश साळी यांनी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, हा कचरा आम्ही जमा करून खोल समुद्रात टाकणार आहोत. त्यांच्या या उत्तराने साळी आवाक झाले प्लॅस्टिक कचरा पुन्हा किनाऱ्याला लागून कचऱ्याचे साम्राज्य पसरणार आहे. कारण खोल समुद्रात टाकणारा कचरा पुन्हा किनाऱ्यावरच येणार आहे. समुद्र किनारी कचरा पसरू नये यासाठी साळी यांनी तातडीने स्थानिक पत्रकारांशी यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार सांगितला. पत्रकारांनी तातडीने आगरदांडा बंदराचे बंदर निरीक्षक यशोधन कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून तातडीने बोट मालकाला तंबी देण्यास सांगितले.यशोधन कुलकर्णी यांनी राजपुरी येथील बोट मालकाचा शोध घेऊन जाळीत अडकलेला प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात असणारा कचरा याची योग्य विल्हेवाट लावण्यास सांगितले, अन्यथा आपणावर दंडात्मक कार्यवाही करण्याचे संकेत दिले.   बोट मालकाने सदरील कचरा जेटीवरून उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावल्याने कचऱ्याचे साम्राज्य होण्यापासून किनारा बचावला आहे.