शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध

By admin | Updated: June 13, 2017 03:05 IST

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाची निवडणूक सोमवारी बिनविरोध पार पडली असून या निवडणुकीमध्ये आमदार जयंत पाटील

- जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाची निवडणूक सोमवारी बिनविरोध पार पडली असून या निवडणुकीमध्ये आमदार जयंत पाटील यांची बँकेच्या चेअरमनपदी सलग पाचव्यांदा निवड झाली.रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात झाली. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांची चेअरमन व व्हाईस चेअरमन म्हणून सुरेश खैरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. जिल्हा उपनिबंधक पी.एम.खोडका यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवडणूक घेण्यात आली. चेअरमन पदासाठी आ. जयंत पाटील व व्हाईस चेअरमन पदासाठी सुरेश खैरे यांनी प्रत्येकी एक अर्ज सादर केले.त्यात दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने चेअरमन पदासाठी आ. जयंत पाटील यांची व व्हाईस चेअरमनपदासाठी सुरेश खैरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या निवडीनंतर ज्येष्ठ शेकाप नेते तथा जिल्हा सहचिटणीस शंकरराव म्हात्रे यांच्या हस्ते आ. जयंत पाटील, सुरेश खैरे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. जिल्ह्यातील अनेक संस्थांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आ. जयंत पाटील व सुरेश खैरे यांना शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना आमदार जयंत पाटील यांनी बँकेच्या सुरु वातीच्या काळापासून ते बँकेच्या आजच्या देदीप्यमान कामगिरीची ओळख सर्वांना करून दिली. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संघर्षातून ताब्यात घेतली. जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे हित सांभाळून प्रामाणिकपणे काम करून आज बँकेची उंची वाढविली आहे. बँकेच्या असंख्य ग्राहक वर्गाला याप्रसंगी धन्यवाद देत त्यांनी शेतकरी आणि मच्छीमारांची आर्थिक उंची वाढविण्यासाठी वेगवेगळे उपक्र म करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे तसेच त्यांच्या मालाचे संरक्षण करण्यासाठी जिल्ह्यात शंभर गोडाऊन उभारण्याचा मानस असून लवकरच त्याची अंमलबजावणी करून जिल्हा बँक हायटेक करण्याचा प्रयत्न असणार आहे, असे मत आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी व्हाईस चेअरमन सुरेश खैरे, शेकाप जिल्हा सहचिटणीस शंकरराव म्हात्रे, कृष्णा गिदी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, संचालक नृपाल पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, प्रभाकर पाटील, अस्लम राऊत, गणेश मढवी, प्रवीण लाले, संतोष पाटील, राजेंद्र हजारे आदी पदाधिकारी, संचालक, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.