शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

शेकापच्या महामोर्चाचा भाजपाला धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 03:46 IST

पत्रकार परिषद : मोर्चातून होणाऱ्या चौफेर हल्ल्याला काउंटर करण्याचा भाजपाचा प्रयत्न

अलिबाग : देशभरात महागाईचा आगडोंब उसळलेला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने कामगार, शेतकरी, मजूर, कष्टकरीवर्गासाठी अन्यायकारक धोरणे आखलेली आहेत. त्याला विरोध करण्यासाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाने गुरुवार, १० जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर महामार्चाचे आयोजन केले आहे. इतिहासाची पाने उलगडून पाहिली असता, शेकापचे मोर्चे हे विराट संख्येने निघालेले आहेत. मोर्चामध्ये भाजपावर चौफेर हल्ला होणार असल्याने भाजपाने या महामोर्चाचा धसका घेतल्याचे चित्र आहे. महामोर्चातून होणारी बदनामी टाळण्यासाठीच बुधवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपाची धोरणे कशी चांगली आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न या पत्रकार परिषदेत करण्यात आल्याचे दिसून आले.

भाजपा सरकारच्या कारकिर्दीमध्ये महागाईने आकाशाला गवसणी घातली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे. कामगार, कष्टकरी, शेतकरी, मजूर अशा सर्वच स्तरातील वर्गावर अन्यायकारक धोरण राबवल्याने त्यांच्या मनामध्ये असंतोष खदखदत आहे. भाजपाची धोरण कशी फसवी आहेत. याचा पर्दाफाश या महामोर्चातून शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार विवेक पाटील, आमदार बाळाराम पाटील, आमदार धैर्यशील पाटील, आमदार सुभाष पाटील करणार आहेत. गावपातळीपासून ते जिल्हापातळीपर्यंत मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे, त्यामुळे हजोरोंच्या संख्येने या महामोर्चामध्ये कष्टकरी, कामगार, शेतकरी, मजूर सहभागी होणार आहेत. भाजपा सरकारवर हल्लाबोल करण्यात येणार असल्याने भाजपाची प्रतिमा मलीन होण्याची शक्यता आहे.या महामोर्चाला काउंटर करण्यासाठी भाजपाने अलिबाग या राजधानीच्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन भाजपा सरकार कसे चांगले काम करत आहे. त्यांनी शेतकºयांसाठी आणलेल्या विविध योजना, उज्ज्वला योजना, विमा योजना, पंतप्रधान किसान संपदा योजना, आरोग्य विमा योजना, विविध आणलेले फूड पार्क, शीतगृहे, शेतमाल प्रक्रिया केंद्र अशा विविध योजनांचा पाढाच भाजपाचे अ‍ॅड. महेश मोहिते यांनी पत्रकार परिषदेमध्ये वाचला.पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाल्याने महागाई कमी झाल्याचेही अ‍ॅड. मोहिते यांनी स्पष्ट केले. शेतकºयांच्या आत्महत्या थोपवण्यात भाजपाला यश आल्याचा दावाही त्यांनी केला. शेकापचा महामोर्चा हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगून शेकापच्या मोर्चातील हवा काढून टाकण्याचा प्रयत्नही केला. भाजपा सरकारने कोणते अन्यायकारक निर्णय घेतले हे शेकापने दाखवून द्यावे, असे खुले आवाहनही त्यांनी करून या मुद्द्यावर थेट चर्चा करण्याची तयारी दर्शवली. या प्रसंगी भाजपाचे अलिबाग तालुकाध्यक्ष हेमंत दांडेकर, परशुराम पाटील आदी उपस्थित होेते.च्भाजपा सातत्याने जाहिरात, सोशल मीडिया, टीव्ही आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जनतेच्या संपर्कात आहे. त्यांनी केलेली कामे, आणलेल्या विविध योजनांचा भडीमार हातोड्याप्रमाणे सतत जनतेवर करण्यात येतो. त्यामुळे भाजपा खरेच काम करत असेल, तर त्यांनी महामोर्चाला घाबरण्याचे कारण नाही, अशी चर्चा आहे.च्शेतकरी कामगार पक्ष हा तीन तालुक्यांपुरता मर्यादित असणारा पक्ष आहे, असे भाजपा नेहमीच हीणवत आली आहे; परंतु आता त्याच शेकाप सारख्या लहान पक्षाच्या महामोर्चाचा धसका भाजपाने घेतल्याचे त्यानिमित्ताने अधोरेखित होते.आज जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकापचा महामोर्चाच्अलिबाग : महागाई आणि केंद्र व राज्य सरकारच्या अन्याय धोरणाविरोधात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा गुरु वार, १० जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे. या मोर्चात रायगड जिल्ह्यातील शेकापचे कार्यकर्ते सहभागी होणार असून, त्याचे नियोजन जिल्हा पातळीवरून गाव पातळीपर्यंत करण्यात आले आहे.च्या मोर्चात शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आ. विवेक पाटील, आ. धैर्यशील पाटील, आ. पंडित पाटील, आ. बाळाराम पाटील या मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. गुरु वार, १० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजल्यापासून शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयासमोर कार्यकर्ते जमणार आहेत. त्यानंतर ११ वाजता मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघणार असल्याची माहिती शेकापच्या सूत्रांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग