शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

बायोगॅस प्रकल्प नादुरुस्त; लाखोंचा खर्च वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 00:39 IST

पनवेल महापालिका पुन्हा निविदा काढणार

- वैभव गायकरपनवेल : पनवेल नगरपरिषद अस्तित्वात असताना पनवेल शहरात मार्केट यार्ड परिसरात उभारण्यात आलेला बायोगॅस प्रकल्प सध्या नादुरुस्त आहे. पनवेल महानगर पालिकेने वर्षभरापूर्वी प्रकल्पाच्या दुरुस्तीकरिता सुमारे तीन लाखांचा निधी देखील खर्च केला. मात्र अद्याप प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही.२००७ मध्ये पनवेल नगरपरिषद अस्तित्वात असताना हा प्रकल्प सुरु करण्यात आला होता. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. ओल्या कचऱ्यावर प्रक्रि या करून तो कुजल्यानंतर त्याच्यातून बायोगॅसची निर्मिती केली जाते. या प्रकल्पाची क्षमता सुमारे ५ मेट्रिक टन एवढी आहे. २०१४ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होता. मात्र त्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे तो बंद पडला.पनवेल महानगर पालिकेची निर्मिती झाल्यानंतर तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी बायोगॅस प्रकल्प नव्याने सुरु केला. यावेळी डिसेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान या प्रकल्पाचे काम पालिकेच्या मार्फत नव्याने हाती घेण्यात आले. स्वच्छ भारत सर्वेक्षणाअंतर्गत समिती येणार असल्याने पालिकेने घाईघाईत हे काम पूर्ण केले. याकरिता सुमारे ३ लाखांचा निधी खर्च केला. मात्र दुरु स्ती करून देखील बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित झाला नाही. सहा महिन्यांपासून हा प्रकल्प ठप्प आहे. प्रकल्पातून निर्माण झालेल्या बायोगॅसमधून प्रायोगिक तत्त्वावर पनवेल शहरातील पथदिवे प्रकाशित करण्यात येणार होते. मात्र ही सर्व संकल्पना धुळीस मिळाल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी एक एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. नजीकच्या काळात आचारसंहितेमुळे टेंडर काढता आले नसल्याने एजन्सी नियुक्त करता आली नाही. आठवडाभरात याकरिता टेंडर प्रक्रि या पूर्ण करून हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू केला जाईल.- गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिकापनवेल नगरपरिषद अस्तित्वात असताना प्रकल्पाची २००७ मध्ये उभारणी करण्यात आली. २०१४ पासून बायोगॅस प्रकल्प बंद आहे. जानेवारी २०१८ मध्ये प्रकल्पाची दुरु स्ती करण्यात आली असून याकरिता ३ लाख रु पयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र तरीही अद्याप प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही.

टॅग्स :panvelपनवेल