शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक शाखा असणारी सर्वात मोठी बँक बनणार, अनंत गीते यांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 03:13 IST

१२० कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशातील ७० टक्के जनता ग्रामीण भागात राहते.

अलिबाग : १२० कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशातील ७० टक्के जनता ग्रामीण भागात राहते. पोस्टाच्या १ लाख ५५ हजार टपाल कार्यालयांतून सुरू होणाऱ्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकद्वारे थेट घरापर्यंत सेवा देणारी इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही सर्वाधिक शाखा असणारी जगभरातील सर्वात मोठी बँक बनणार असल्याचा विश्वास केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी शनिवारी व्यक्त केला.येथील मुख्य टपाल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. अलिबागचे आमदार पंडित पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील, टपाल विभागाच्या नवी मुंबई क्षेत्राच्या पोस्टमास्तर जनरल शोभा मधाळे, अलिबाग पोस्ट आॅफिसचे अधीक्षक व्ही.सी. घोलकर आदी यावेळी उपस्थित होते. गीते यांच्या हस्ते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या विशेष कव्हरचे अनावरण करण्यात आले. तसेच बँकेच्या खातेधारकांना क्यू आर कोड कार्डचे वितरणही करण्यात आले.गीते म्हणाले, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून घरापर्यंत बँकसेवा पोहोचवण्याचा उपक्रम प्रशंसनीय आहे. या बँकेसेवेमुळे ग्रामीण भागातील जनतेला तंत्रज्ञानाची ओळख तर होईलच शिवाय बँक व्यवस्थेशीही जोडण्यात मदत होईल. ज्येष्ठ नागरिकांनाही बँक सेवेचा लाभ घरबसल्या मिळेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अवलंबामुळे टपाल विभागाचा पारंपरिक चेहरामोहरा बदलून अधिकारी व कर्मचाºयांमध्ये नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.कार्यक्र माचे प्रास्ताविक अलिबाग शाखा प्रबंधक वैभव कावरे यांनी तर मिलिंद पाटील यांनी आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन केले. यावेळी अनेक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्र माप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे झालेल्या मुख्य सोहळ्याचे थेट प्रसारण दाखविण्यात आले.इंडिया पोस्ट पेमेंट बँक सेवेचे स्वागतआ. पंडित पाटील म्हणाले, इंडिया पोस्ट पेमेंट बँक सेवेचे स्वागतच केले पाहिजे. मात्र त्याचबरोबर पोस्टाच्या इमारतींचे आणि कामगारांच्या निवासी वसाहतींचे रूप देखील बदलले पाहिजे. बँकेचा सर्वाधिक फायदा ज्येष्ठ नागरिकांना होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.डिसेंबरअखेर जिल्ह्यात तीनशे ठिकाणी सुविधानवी मुंबई विभागाच्या पोस्ट मास्तर जनरल शोभा मधाळे यांनी नव्या संकल्पनेची माहिती उपस्थितांना दिली. या शाखेअंतर्गत रेवदंडा, बोर्लीमांडला, विक्रमनगर आणि कोर्लई या चार उपशाखा शनिवारी सुरू करण्यात आल्या. डिसेंबरअखेर जिल्ह्यात तीनशे ठिकाणी ही बँक सुविधा उपलब्ध होईल, असे त्यांनी अखेरीस सांगितले.

टॅग्स :Anant Geeteअनंत गीते