शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

जिल्ह्यात भुजबळांच्या अटकेचे पडसाद

By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी अटक केल्याच्या

अलिबाग : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी अटक केल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात मंगळवारी ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने अलिबागच्या तहसीलदारांना याबाबत निवेदन दिले. भुजबळ यांना झालेली अटक बेकायदा आहे. भाजपाच्या दबावामुळे सुडात्मक कारवाई केली आहे. सरकारच्या या कृत्याचा तीव्र शब्दात धिक्कार करण्यात येत असल्याचे अलिबाग तालुकाध्यक्ष मनोज धुमाळ यांनी निवेदनात नमूद केले आहे. भुजबळ आमचे नेते आहेत, त्यांना झालेल्या बेकायदेशीर अटकेविरोधात रास्ता रोको करण्यात येणार होता, मात्र सध्या परीक्षांचा हंगाम सुरु असल्याने निषेधाचे निवेदन तहसीलदारांना देल्याचे धुमाळ यांनी सांगितले.खालापुरात रास्ता रोकोखालापूर : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना अटक केल्याच्या निषेध व्यक्त करण्यासाठी मंगळवारी सकाळी ११ वा.च्यासुमारास खोपोली व खालापूर तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवर रस्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला हिंसक वळण लागू नये व एक्स्प्रेस वे वाहतुकीचा खोळंबा होवू नयेत म्हणून खोपोली व खालापूर पोलिसांनी खालापूर टोलनाक या आंदोलन स्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता . महाडमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यातमहाड : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अटकेच्या निषेधार्थ महाडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रास्त रोको केले. यावेळी सुमारे वीस कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेवून त्यांची सुटका केली. यावेळी काही काळ महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुभाष निकम आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. नाते खिंड येथे रास्ता रोको करण्यात आले.मुंबई - पुणे महामार्गावर रास्ता रोकोवावोशी : खालापूर तालुका व खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष अंकित साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई - पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन केले होते, परंतु खालापूर उपविभागीय डीवायएसपी बी. पी. कल्लुरकर, खालापूर पोलीस निरीक्षक रामगुडे यांच्या पथकाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या रास्ता रोको आंदोलनास विरोध केला. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. माणगावमध्ये राष्ट्रवादीचा रास्ता रोको माणगाव : माजी मंत्री छगन भुजबळ यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी ईडीने सोमवारी रात्री अटक केल्याच्या निषेधार्थ माणगावमध्ये मंगळवारी दुपारी २.३० वाजता तालुका अध्यक्ष बाबूराव भोनकर यांच्या नेतृत्वखाली रास्ता रोको करण्यात आला. मुंबई- गोवा रस्त्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रास्ता रोको केला. तालुका अध्यक्ष बाबूराव भोनकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यात आलेल्या अपयशामुळे जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करण्यात येत आहे असा आरोप भोनकर यांनी केला. यावेळी आनंद यादव, संगीता बक्कम आदी उपस्थित होते.