शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

भरत गोगावलेंनी राजीनामा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2016 01:32 IST

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले, त्याच सत्याग्रह दिनाच्या वर्धापन दिनादरम्यान शिवसेना आमदार

महाड : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले, त्याच सत्याग्रह दिनाच्या वर्धापन दिनादरम्यान शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी तळ्याचे ब्राम्हणाकडून पूजन करून घेतले. हे कृत्य म्हणजे डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाला मूठमाती देणारे असल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाचे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांनी केला. तमाम आंबेडकरी जनतेचा अपमान करणाऱ्या कृत्यात सहभागी झालेल्या महाडचे शिवसेना आ. भरत गोगावले यांनी आपल्या आमदारकीचा त्वरित राजीनामा द्यावा, तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी एकमुखी मागणी महाडच्या चवदार तळ्यावर आंबेडकरी जनतेच्या निषेध सभेत मंगळवारी करण्यात आली.जलसंपदा विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जलजागृती सप्ताहानिमित्त चवदार तळ्याचे ब्राम्हणाकडून जलपूजन करण्यात आले होते. या घटनेच्या निषेधार्थ महाड तालुक्यातील सर्व आंबेडकरी संघटनांतर्फे मंगळवारी भव्य निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट), भारतीय रिपब्लिकन पक्ष, बौध्दजन पंचायत समिती, भारतीय बौध्द महासभा, पीपल्स रिपब्लिकन पार्टी रिपब्लिकन सेना, डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समिती या संघटनेचे नेते, पदाधिकारी तसेच महाड तालुक्यातील सुमारे दीड हजारहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. सिध्दार्थ कासारे यांनी आ. भरत गोगावले यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. आ. गोगावले यांना जलपूजाच करायची होती मग ती सावित्री किंवा गांधारी नदीच्या पाण्याची का केली नाही, असा प्रश्न करीत या जलपूजनासाठी सत्याग्रह दिनाचाच मुहूर्त का निवडला गेला असे सांगून डॉ. बाबासाहेबांच्या अस्मितेचा, तसेच त्यांच्या विचारांचा हा अपमान असल्याची टीकाही केली.यावेळी ठाण्याचे दलित नेते सुनील खांबे, भारिप बहुजन महासंघाचे नेते तुळशीराम जाधव, रिपाइं उपाध्यक्ष केशव हाटे, भारिप नेते सज्जन पवार, विश्वनाथ सोनावणे,लक्ष्मण जाधव आदींनी या जलपूजनाचा तीव्र निषेध केला. या सभेला मुंबई, ठाणे येथील दलित नेतेही उपस्थित होते. (वार्ताहर)तळ्याचे पाणी प्राशन करून निषेधज्या ठिकाणी आ. गोगावले यांच्या उपस्थितीत जलपूजन झाले, त्या ठिकाणी सर्व नेते व कार्यकर्त्यांनी तळ्याचे पाणी प्राशन करून या घटनेचा निषेध केला. या सभेच्या वेळी जयभीम व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषाने चवदार तळे परिसर दुमदुमून गेला होता. सभेनंतर सर्व नेत्यांनी प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांना निवेदन देऊन जलपूजनाच्या नावाखाली तळ्याचे जलशुध्दीकरण करून घेणाऱ्यांवर जातीयवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.