शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

दुर्बल घटकातील बालकांना उत्तम शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 03:06 IST

आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच समाजातील वंचित घटकांतील मुलांना प्रवेश नाकारून विविध शिक्षण संस्था अन्य विद्यार्थ्यांकडून बक्कळ रक्कम उकळून आर्थिकदृष्ट्या चांगल्याच गब्बर झाल्या होत्या.

अलिबाग : आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच समाजातील वंचित घटकांतील मुलांना प्रवेश नाकारून विविध शिक्षण संस्था अन्य विद्यार्थ्यांकडून बक्कळ रक्कम उकळून आर्थिकदृष्ट्या चांगल्याच गब्बर झाल्या होत्या. शाळांच्या या मनमानी कारभाराला आता शिक्षण हक्क कायद्याची छडी लागून त्यांच्यावर अंकुश लागला आहे. याच कायद्यानुसार खासगी शाळांना आता आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांसाठी २५ टक्के प्रवेश राखून ठेवावे लागणार आहेत. त्याबाबतची आरक्षण सोडत मंगळवारी जिल्हा परिषदेमध्ये पार पडली.राज्यातील आर्थिक दुर्बल, सामाजिक वंचित घटकातील बालकांना उत्तम आणि दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण हक्क कायदा सरकारने लागू केला आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना कायम विनाअनुदानित व खासगी विनाअनुदानित शाळेच्या प्रवेशात २५ टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सोडत शिक्षण सभापती नरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली.आर्थिक दुर्बल, सामाजिक वंचित बालकांना खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के राखीव या उपक्र मामध्ये पूर्व प्राथमिक वर्गासाठी ४३७ प्रवेश आणि प्राथमिक वर्गासाठी तीन हजार ६२८ प्रवेश असे एकूण चार हजार ६५ मुलांना आरक्षण कोटा ठेवण्यात आला आहे. यानुसार २० जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान पालकांना अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु याचा लाभ शेवटच्या स्तरापर्यंत व्हावा यासाठी ही मुदत १० फेब्रुवारी ते ११ मार्चपर्यंत वाढविण्यात आली होती. त्यानुसार चार हजार २६८ विद्यार्थ्यांचे अर्ज जिल्ह्यातून आलेहोते.याबाबतची सोडत मंगळवारी जिल्हा परिषदेच्या नाना पाटील सभागृहात काढण्यात आली. २५ टक्के आरक्षणामधून अल्पसंख्याक शाळांना वगळण्यात आले असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.>खासगी शाळेत मिळणार शिक्षणखासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये अनेक वेळेला या घटकांच्या कोट्यातील प्रवेश इतरांना देऊन मोठी रक्कम उकळली जात होती.या पध्दतीमुळे अनेक शैक्षणिक संस्था चांगल्याच गब्बर झाल्या आहेत. तसेच त्यांची मनमानीही वाढली होती.शिक्षण हक्क कायद्यामुळे आता खासगी शाळांनी प्रवेश नाकारला तर त्यांच्या शाळेची मान्यताही रद्द होणार आहे.त्यामुळे आता खासगी शाळांमध्ये वंचित घटकातील बालकांना उत्तम शिक्षण मिळण्यातील मार्ग मोकळा झाला आहे.>मोबाइलवर येणार नंबर लागल्याचा संदेशपाल्याचा प्रवेश निवडलेल्या शाळेत सोडतीद्वारे होणार आहे. पालकांना आपल्या पाल्याला ज्या शाळेत पाठवायचे आहे अशा १० शाळा निवडण्याचा अधिकार देण्यात आला होता.सोडतीनंतर ज्या पाल्याचा नंबर लागला आहे त्यांना मोबाइलद्वारे संदेश पाठविण्यात येणार आहे. पाल्याचा नंबर शाळेत लागल्यानंतर १४ ते २४ मार्च दरम्यान प्रवेश प्रक्रि या पूर्ण करावयाची आहे.आर्थिक दुर्बल, सामाजिक वंचित घटकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलांना उत्तम दर्जाच्या खासगी शाळांमध्ये प्रवेश घेणे जमत नाही.सरकारने शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के आरक्षण खासगी व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये जाहीर केले आहे. त्यामुळे या मुलांनाही उत्तम दर्जाचे शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे.>25% आरक्षण सरकारने शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये जाहीर, 10 शाळा निवडण्याचा अधिकार>पाल्याचा नंबर शाळेत लागल्यानंतर १४ ते २४ मार्च दरम्यान प्रवेश प्रक्रि या पूर्ण करावयाची आहे.

टॅग्स :Raigadरायगड