शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगमुळे चवदार तळ्याच्या भिंतींना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:55 IST

ऐतिहासिक चवदार तळ्याच्या दक्षिण बाजूस रस्त्यालगत नियमितपणे पार्किंग केल्या जाणाºया अवजड वाहनांच्या बेकायदा पार्किंगमुळे तळ्याच्या संरक्षक भिंतीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

महाड : ऐतिहासिक चवदार तळ्याच्या दक्षिण बाजूस रस्त्यालगत नियमितपणे पार्किंग केल्या जाणाºया अवजड वाहनांच्या बेकायदा पार्किंगमुळे तळ्याच्या संरक्षक भिंतीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या गंभीर गोष्टीकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून के ला जात आहे. या संरक्षक भिंतीलगत बेकायदा वाहने पार्किंग करणाºयांवर वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी दलित कार्यकर्ते अशोक मोरे यांनी केली आहे.शहरातील वाहतूककोंडीला कारणीभूत ठरत असलेल्या महाडमधील प्रमुख मार्गांवर नो पार्किंग झोन करण्याचा ठराव करून तसा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे नगरपरिषदेने मंजुरीसाठी पाठवला होता. त्याला जिल्हाधिकाºयांनी दीड वर्षापूर्वी मंजुरी दिली होती. मात्र या निर्णयाची शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागाकडून अंमलबजावणी केली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेसह सुर्वे हॉस्पिटल, बालाजी मंदिर मार्ग, शिवाजी चौक, चवदार तळे आदी मार्गांवर नियमितपणे होणारी वाहतुकीची कोंडी ही नगरपरिषद व महाडकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून महाड नगरपरिषदेतर्फे बेकायदा हातगाड्या व फेरीवाल्यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आल्यामुळे या प्रमुख मार्गांनी मोकळा श्वास सोडला असला तरी बेकायदा पार्किंग केलेल्या वाहनांमुळे या प्रमुख मार्गांवरील वाहतूककोंडी दूर होत नसल्याचे दिसून येत आहे.चवदार तळ्याच्या दक्षिण बाजूला रस्त्यालगत पंचवीस-तीस टन वजनाच्या हायवा व डंपर्स राजरोसपणे पार्किंग केले जात असल्याने तळ्याच्या संरक्षक भिंतीला धोका निर्माण होण्याची शक्यता असून या बेकायदा पार्किंगगुळे वाहतूक कोंडी होत आहे. या रस्त्यालगत नगर परिषदेने नो पार्किंगचे लावलेले फलक देखील या वाहनधारकांनी उखडून टाकले आहेत. या बेकायदा पार्किंग करणाºयांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांसह शहरवासीयांकडून केली जात आहे.