शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या भिंतीजवळ बार, मात्र अधिकारी म्हणतात अंतर ८५ मीटर

By वैभव गायकर | Updated: March 15, 2024 09:51 IST

शाळेपासूनच्या अंतरावरून उत्पादन शुल्क विभागाचे कागदी घोडे

वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल : शैक्षणिक संस्थेपासून ७५ मीटर अंतरावर बार अथवा इतर मद्यविक्रीच्या दुकानांना राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी मिळत नाही. मात्र, पनवेलमधील कोन गावाजवळ शाळेच्या भिंतीजवळच बार असतानाही विद्यार्थी, पालकांना याच ठिकाणाहून जावे लागत आहे. ‘लोकमत’ने ‘बाबा, बार म्हणजे काय?’ या आशयाचे वृत्त प्रकाशित करताच उत्पादन शुल्क विभागाने १४ मार्च रोजी शाळा आणि बारचे अंतर मोजले. ते ८५  मीटर असल्याचे उत्पादन शुल्क विभागाचे म्हणणे आहे.

कोन गावाजवळील सेंट झेव्हियर्स इंग्लिश हायस्कूलपासून हाकेच्या अंतरावर गोल्डन नाइट नावाचा बार आहे. सेंट झेव्हियर्स शाळेत नर्सरी ते दहावीचे सुमारे १५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, असे असतानाही प्रशासकीय पातळीवर याबाबत ठोस उपाययोजना अथवा कारवाई झालेली दिसून येत नाही. सर्व यंत्रणा मूग गिळून गप्प झाल्यासारखी परिस्थिती या ठिकाणी आहे. 

बारला क्लीन चिट?

कोन परिसरात २००१ साली सेंट झेव्हियर्स शाळा सुरू झाली. तेव्हा या परिसरात एकही बार अस्तित्वात नव्हता. मात्र, कालांतराने या परिसरात बार सुरू होण्याची मालिका सुरू झाली. अनेक वेळा आंदोलनेदेखील उभी राहिली.  सेंट झेव्हियर्स शाळा आणि गोल्डन नाइट बारचे अंतर तपासण्यासाठी उत्पादन शुल्क पनवेल विभागाचे निरीक्षक उत्तम आव्हाड हे आले होते.  त्यांनी मोजलेले अंतर ८५ मीटर असल्याने बारला क्लीन चिट मिळणार हे स्पष्ट झाले.  

शाळा म्हणते, तक्रार नाही!

सेंट झेव्हियर्स इंग्लिश हायस्कूलचे शाळा प्रशासनदेखील याबाबत उघडपणे भूमिका घेण्याच्या तयारीत नाही. शाळेचे जनसंपर्क अधिकारी व्ही.ए. म्हात्रे यांनी शाळेची बाजू मांडताना बारबाबत शाळा अथवा पालकांची  तक्रार नसल्याचे स्पष्ट केले. पीटीएमध्ये  पालकांच्या बारबाबत  तक्रारी प्राप्त नसल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली. त्यामुळे शाळा प्रशासनावर दबाव तंत्राचा अवलंब केला की काय, अशी शक्यता वर्तविण्यात येते.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या  नियमानुसार, शाळेपासून ७५ मीटर अंतरापर्यंत बार अथवा इतर दारूच्या दुकानांना परवाना देता येत नाही.  कोन गावाजवळील सेंट झेव्हियर्स इंग्लिश हायस्कूल आणि बार यामधील अंतर ८५ मीटर आहे. - आर.आर. कोळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, रायगड. 

टॅग्स :panvelपनवेल