शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पेणमध्ये तांबड्या मातीच्या बाप्पाचा ‘श्रीगणेशा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:46 IST

लाल मातीपासून इकोफ्रेंडली मूर्तींची निर्मिती

दत्ता म्हात्रेलाेकमत न्यूज नेटवर्कपेण : गावच्या परिसरातील डोंगर पठारावरील लालबुंद तांबडी माती सर्वकामी उपयोगी पडते. पूर्वी रंगकाम करण्यासाठी घरांच्या भिंती, काडवी बांबूंचे कुड जे इकोफ्रेंडली घरांसाठी भिंतीसारखे असत. या कुडांना शेणमातीचे लिंपण देऊन नंतर सफेद चुना, त्यावर या तांबड्या मातीचा रंगकाम म्हणून सर्रास वापर करीत असत. त्यानंतर आता या मातीपासून पेणच्या गणेश मूर्तिकारांनी चक्क गणेशमूर्ती साकारून इकोफ्रेंडली पर्यावरणपूरक अशा या मूर्तिकलेचा प्रारंभ केला आहे. या इकोफ्रेंडली मूर्तींना भविष्यात चांगले दिवस येतील, अशी भावना पेण शहरातील मूर्तिकार करीत आहेत. 

मातीशी नातं हा जिव्हाळ्याचा विषय आहे. या मातीतून कला, क्रीडा बहरली. लाल मातीच्या आखाड्यात कुस्ती, क्ले कोर्टवर टेनिस, रेसकोर्सवर घोड्यांच्या शर्यती, क्रिकेट स्टेडियमवर क्रिकेट खेळ, सर्व क्रीडा प्रकार मातीत बहरले, विस्तारले. त्यात तांबड्या मातीचा रंग व गंध वेगळाच. या मातीने मनोरंजन क्षेत्रातही चांगले नाव कमावले आहे. वारली पेंटिंगमध्ये लाल मातीचे रंग भरले ती माती पूर्वीपासून कुंभार समाज मातीची मडकी व गणेशमूर्ती बनवीत असत; पण शाडू माती व प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर सुरू झाल्यानंतर गावच्या डोंगर, पठारावरील लालबुंद तांबडी माती मूर्तिकार वापरनेसा झाले. पण पर्यावरणपूरक इकोफ्रेंडली गणपती बाप्पांच्या मूर्तींची​ मागणी लक्षात घेऊन पेण महलमिया डोंगरावरील लाल तांबड्या मातीपासून बाप्पाची मूर्ती बनविण्याचे ​काम पेणचे मूर्तिकार दिलीप लाड यांच्या कार्यशाळेत ​सुरू आहे.

nतांबडी माती चाळून वस्त्रगाळ करून पाण्यात भिजवून मळली जाते. त्यानंतर​ साच्यात लोण्यासारखे मातीचे गोळे दाबत त्यातून गणेशमूर्ती साकारली जाते. पाण्याने याला फिनिशिंग देत सुंदर मूर्ती तयार केली जाते. 

nअतिशय नाजूक व हळुवारपणे या  पद्धतीने ​या मातीच्या गणेशमूर्ती तयार करून इकोफ्रेंडली मूर्तीची निर्मिती ​तयार होत असल्याने   पर्यावरण​पूरक मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर  लगेचच पाण्यात विरघळत असल्याने ती गणेशभक्तांच्या पसंतीस पडेल, असे मूर्तिकार​ दिलीप लाड यांनी म्हटले ​आहे.

टॅग्स :Raigadरायगड