शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वाकण-खोपोली महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:27 IST

वाकण-पाली-खोपोली या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ अ चे दुहेरीकरणाचे बांधकाम इपीसी तत्त्वावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई यांच्यामार्फत हाती घेण्यात आले

पाली : वाकण-पाली-खोपोली या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ अ चे दुहेरीकरणाचे बांधकाम इपीसी तत्त्वावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई यांच्यामार्फत हाती घेण्यात आले असून ते काम बेग कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी करीत आहे. काही ठिकाणी रस्त्याचे काम अतिपर्जन्यवृष्टीमुळे अर्धवट राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तेथून अवजड वाहतूक करणे धोकादायक आहे. तसेच पाली येथील अंबा नदीवरील पूल हा जुना व जीर्ण झाला असल्याने यावरून अति अवजड वाहनांची वाहतूक झाल्यास धोका निर्माण होऊ शकतो व दुर्घटना होऊ शकते. हे टाळण्यासाठी जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी वाकण-खोपोली राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी करण्यात येत असल्याची अधिसूचना सोमवार १५ जुलै रोजी पाली-सुधागड तहसीलदार यांना दिलेल्या पत्राद्वारे काढली आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभाग मंत्रालयाने, वाकण-पाली-खोपोली हा रस्ता नवीन राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ अ मध्ये घोषित केला आहे. हा रस्ता २३ जून, २०१७ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास हस्तांतरित झाला असून, या रस्त्याचे दुहेरीकरणाचे बांधकाम इपीसी तत्त्वावर केंद्रीय मंत्रालयाच्या निदेशानुसार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई यांच्या मार्फत हाती घेण्यात आले आहे. सद्यस्थिती हे काम प्रगतीत असून काही ठिकाणी तात्पुरते वळण रस्ते दिलेले आहेत. परंतु सध्याच्या अति पर्जन्यवृष्टीमुळे हे वळण रस्ते काही ठिकाणी क्षतीग्रस्त झाले आहेत. तसेच सध्या सुरु असलेल्या पावसामुळे अंबा नदीवरील पाली येथील पुलावरून पावसाचे पाणी वाहते हा पूल जुना व जीर्ण असल्यामुळे या मार्गावरील अवजड वाहतूक मुंबई-गोवा महामार्गाहून, पेण-खोपोली मार्गाहून वळविण्यात यावी अशी मागणी कार्यकारी अभियंता (रा.म) म.रा.र.वि यांनी लेखी पत्राव्दारे जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे केली होती. त्या अनुषंगाने सद्यस्थिती जिल्ह्यात सुरु असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे तसेच पाली येथील अंबा नदी पुलावरून होणाऱ्या अतिअवजड वाहतुकीमुळे पूल तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने वाकण-पाली-खोपोली महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करून, ही वाहतूक मुंबई-गोवा महामार्गाहून पेण-खोपोली मार्गाहून वळविण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी पत्राद्वारे सबंधित विभागांना दिल्या आहेत.