शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

सोलणपाडा धबधब्यावर मद्यास बंदी

By admin | Updated: August 29, 2015 22:13 IST

तालुक्यातील जामरु ंग येथील जिल्हा परिषदेच्या पाझर तलावावर वर्षासहलीसाठी सध्या शेकडो पर्यटक सोलणपाडा येथे येत आहेत. या पर्यटकांकडून मद्याच्या बाटल्या तसेच कचरा परिसरात

कर्जत : तालुक्यातील जामरु ंग येथील जिल्हा परिषदेच्या पाझर तलावावर वर्षासहलीसाठी सध्या शेकडो पर्यटक सोलणपाडा येथे येत आहेत. या पर्यटकांकडून मद्याच्या बाटल्या तसेच कचरा परिसरात टाकण्यात येतो. त्यामुळे धबधबा परिसरात मद्य नेण्यास ग्रामपंचायतीकडून बंदी घालण्या आली आहे. टेंभरे ग्रामपंचायत आणि सोलणपाडा - जामरुंग येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेवून हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर वाहतुकीबाबतही नियोजन करण्यात आले आहे.सोलणपाडा येथील पाझर तलावावर यंदा किमान दहा हजार पर्यटकांनी हजेरी लावली आहे. ते आपली वाहने घेवून येत असताना कोणतेही नियम पाळत नसल्याने शनिवार आणि रविवारी वाहतूक कोंडी नित्याची झाली होती. यासाठी टेंभरे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांनी पार्र्किंगसाठी जागा निश्चित केली आहे. कोणतेही वाहन हे सोलणपाडा गावाच्या बाहेर पाझर तलावाकडे जाणार नाही, याबाबतही काळजी घेण्यात येणार आहे. पाझर तलावाची मालकी असलेल्या जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी तसेच पोलिसांना यावेळी बोलविण्यात आले. त्यांनी प्रथम वाहतूक नियोजन आणि पर्यटक घेऊन येणारे मद्य यावर चर्चा झाली. त्यातून जामरु ंग येथे जाताना सर्व वाहने पोलिसांच्या मदतीने तपासून कोणीही मद्य घेऊन जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे नियोजन झाले आहे. ग्रामस्थांकडून आता वाहनांबाबत योग्य नियोजन करण्यात येत असून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीने मजूर लावले आहेत.