शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घारापुरी बेटावरील महाशिवरात्री उत्सवावर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 01:37 IST

शासनाच्या आदेशाने यात्रा रद्द : शिवभक्तांची नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी यावर्षी ११ मार्च रोजी घारापुरी बेटावर भरविण्यात येणारा जागतिक महाशिवरात्रीचा उत्सव शासनाच्या आदेशाने रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे दरवर्षी महाशिवरात्री निमित्ताने घारापुरी बेटावर घुमणारे बम...बम... भोलेचे सूर यंदा बेटावर घुमणार नाहीत.मुंबईपासून अवघ्या ११ किमी अंतरावर असलेले घारापुरी बेट सहाव्या शतकातील प्राचीन शिवकालीन लेण्यांमुळे कायम जागतिक प्रसिद्धीच्या झोतात राहिले आहे. काळ्या पाषाणात शिवाची विविध रुपे असलेली अनेक प्रचंड शिल्प आहेत. मोठ्या खुबीने कोरलेल्या शिल्पांमध्ये अर्धनारीश्‍वर शिव, कल्याणमूर्ती, अंधकासुरवध, गंगावतारण शिव, योगीश्‍वर उमामहेश्‍वरमूर्ती आणि २० फूट उंच महेशमूर्ती आदी शिल्पांचा समावेश आहे.

महाशिवरात्री निमित्ताने बेटावरील या शिवलिंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक आणि शिवभक्त येतात. त्यामुळे घारापुरी बेटावरील महाशिवरात्रीला जागतिक महाशिवरात्री म्हणूनही ओळखली जाते.घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्ताने हजारो शिवभक्त येतात. यामध्ये देशी -विदेशी पर्यटक आणि शिवभक्तांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो. शिवदर्शनासाठी येणाऱ्या विदेशी पर्यटकांमुळे बेटावरील महाशिवरात्रीला जागतिक महाशिवरात्री म्हणूनही ओळखली जाते. बेटावर जाण्या-येण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया,जेएनपीटी,उरण-मोरा,न्हावा बंदरातून होड्या,लॉचेस,मचव्यांची सोय असते.यावर्षी मात्र कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर घारापुरी बेटावर भरविण्यात येणाऱ्या महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यावर शासनाने प्रतिबंध घातले आहेत.

सागरी मार्ग बंदच११ मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त गेटवे ऑफ इंडिया,जेएनपीटी,उरण-मोरा,न्हावा बंदरातून घारापुरी बेटावर सागरी मार्गाने येणाऱ्या होड्या, लॉचेस,मचव्यांनाही सक्तीची बंदी घालण्यात आली आहे. शिवभक्त भाविकांनी शासनाने घातलेल्या बंदीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन घारापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी भाविकांना केले आहे.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीRaigadरायगड