शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

चवदार तळ्यात पोहण्यास बंदी घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:12 IST

भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी पाण्याचा सत्याग्रह केला त्या ऐतिहासिक चवदार तळ्यामध्ये पोहण्यास, तसेच या तळ्याच्या काठावर खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लावण्यास नगरपरिषदेने बंदी करावी

महाड : भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी पाण्याचा सत्याग्रह केला त्या ऐतिहासिक चवदार तळ्यामध्ये पोहण्यास, तसेच या तळ्याच्या काठावर खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लावण्यास नगरपरिषदेने बंदी करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष मोहन खांबे यांच्या नेतृत्वाखाली कोकण विभाग अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, शहराध्यक्ष प्रभाकर खांबे, जिल्हा उपाध्यक्ष केशवराव हाटे, सरचिटणीस लक्ष्मण जाधव, अशोक मोहिते, जयराज जाधव, अशोक मोरे यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांची भेट घेवून याबाबत कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली. मागील आठवड्यात चवदार तळ्यात पोहताना एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी ही मागणी केली. तसेच चवदार तळ्याच्या लगत डॉ. आंबेडकर चौकात खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लावण्यात येत असल्याने, तसेच त्या ठिकाणी खाद्यपदार्थ जाणीवपूर्वक तळ्यात टाकले जात असून चवदार तळ्याची यामुळे विटंबना होत असल्याचे शिष्टमंडळाने सांगताना या खाद्यपदार्थांच्या हातगाड्या नगरपरिषदेने त्वरित हटवाव्यात, अशी मागणी निवेदनात केली आहे. तसेच तळ्याच्या दक्षिण बाजूला नियमितपणे पार्र्किं ग केलेली वाहने नगरपरिषदेने त्वरित हटविण्यात यावी, अशी मागणी देखील निवेदनात केली आहे.तसेच तळ्याच्या दक्षिण बाजूला नियमितपणे पार्किंग केलेल्या वाहनांवर नगरपरिषद आणि पोलिसांनी कारवाई करावी,अशी मागणी मोहन खांबे यांनी केली.