शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
3
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
4
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
5
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
6
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
7
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
8
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
9
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
10
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
11
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
12
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
13
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
14
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
15
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
16
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
17
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
18
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
19
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
20
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!

जिल्हाधिकारी कार्यालयांवर बैलगाडी मोर्चा

By admin | Updated: February 15, 2017 04:52 IST

शासनाने आवश्यक त्याठिकाणी निवडणूक काळातही निवडणूक आयोगाच्या परवानगीने अध्यादेश काढले आहेत. मात्र हे सरकार

अलिबाग : शासनाने आवश्यक त्याठिकाणी निवडणूक काळातही निवडणूक आयोगाच्या परवानगीने अध्यादेश काढले आहेत. मात्र हे सरकार आचारसंहितेचे कारण दाखवून अध्यादेश काढण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन बैलगाडी शर्यत सुरू करण्याचा अध्यादेश काढावा, अथवा आचारसंहिता संपल्यानंतर अध्यादेश काढण्याचे लेखी स्वरूपात द्यावे, अन्यथा गनिमी काव्याने हजारोंच्या संख्येने बैलगाड्या घेऊन मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा आक्र मक इशारा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी दिला आहे.रायगड जिल्ह्यात बैलगाडी शर्यतीला विशेष मान आहे. परंपरा जपण्यासाठी प्रत्येक शेतकरी धडपडत आहे. त्यामुळे शेकापच्या माध्यमातून रायगड बाजार येथून बैलगाड्यांसह शेकापच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. मराठी अस्मिता जपत आ. जयंत पाटील यांनी बैलगाडी स्वत: हाकत जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला होता. आ.पाटील पुढे म्हणाले, राज्य शासन रेसकोर्सवर भांडवलदारांना पैसा उडविण्याची मुभा देत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या परंपरेवर, तसेच त्यांच्या हौशीवर आडकाठी निर्माण करीत आहे. प्राणी संरक्षण संघटनांनी अटी घालून बैलगाडी शर्यतीला मान्यता द्यावी, अन्यथा शेकापक्ष अधिक आक्र मक भूमिका घेईल. अलिबाग हे पर्यटनदृष्ट्या विकसित होत आहे. बैलगाडी शर्यतीदेखील सुट्यांच्या कालावधीत आयोजित केल्या जात असल्याने पर्यटकांचा ओघ वाढत आहे. बैलगाडी शर्यत सुरू करण्यासाठी शेकापचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे आ.पाटील यांनी स्पष्ट केले.बैलगाडी शर्यतीसाठी प्राणी संरक्षण संस्था तसेच राज्य शासनाने बैलगाडी संघटनांबरोबर चर्चा करावी. त्यांनी सूचित केलेल्या अटी बैलगाडी हौशींना मान्य असतील, मात्र बैलगाडी या पारंपरिक खेळावर बंदी मान्य केली जाणार नाही. त्यामुळे पुढच्या महिन्यात मुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक विचार करून बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवावी, अन्यथा गनिमी काव्याने मंत्रालयावर धडक मोर्चा काढू. यामध्ये शासनाने तुरु ंगात टाकले तरी मागे हटणार नाही, असा इशारा आ. जयंत पाटील यांनी दिला आहे.अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, आ. पंडित पाटील, अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. आस्वाद पाटील, जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, अनंतराव देशमुख आदींसह बैलगाडी शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)