शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण मागे

By admin | Updated: September 5, 2015 03:05 IST

पेण येथील आदिवासी उपयोजनेच्या प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडे यांच्या बदलीच्या आणि आदिवासी वसतिगृहासंबंधी विविध मागण्यांसाठी नेरळ येथे वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी

नेरळ : पेण येथील आदिवासी उपयोजनेच्या प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडे यांच्या बदलीच्या आणि आदिवासी वसतिगृहासंबंधी विविध मागण्यांसाठी नेरळ येथे वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी दुपारपासून उपोषण सुरू केले होते. मात्र कर्जत तालुका आदिवासी ठाकूर कातकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांची समजूत काढण्यात यश आल्याने मध्यरात्री ११ वाजता त्यांनी उपोषण मागे घेतले. तेथील अनेक विद्यार्थी शुक्रवारी सकाळी कॉलेजला रवाना झाल्याची माहिती तेथील गृहपाल सालवे यांनी दिली.पेण येथील आदिवासी वसतिगृहामधील विद्यार्थ्यांबाबत तेथील प्रकल्प अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केले म्हणून जिल्ह्यात आदिवासी वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले होते. त्यानंतर कर्जत आणि नेरळ येथील आदिवासी वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले. नेरळमधील ४० विद्यार्थी उपोषण करण्यासाठी गुरुवारी (१ सप्टेंबर) दुपारी बसले. रात्री ही माहिती कर्जत तालुका आदिवासी ठाकूर कातकरी समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी वसतिगृहात जाऊन उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. संघटनेचे पदाधिकारी सुनील पारधी, दत्ता निरगुडा, जैतू पारधी, सुनील हिंदोला यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत स्थानिक आमदार सुरेश लाड आणि शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांच्याशी चर्चा केली. त्यांनी राज्य सरकारच्या संबंधित विषय मार्गी लावण्यासाठी आदिवासी विकास विभागाचे मंत्री आणि शासन यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रात्री सर्व विद्यार्थ्यांनी उपोषण सोडले. (वार्ताहर)