शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत तालुक्यातील नेरळच्या खांडा भागात झाडांवर कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:03 IST

वनविभागाची मूक संमती : इमारती बांधण्यासाठी वृक्षतोड; ग्रामपंचायतीची परवानगी नाही

कांता हाबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यातील नेरळ गावात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असून काँक्रीटचे जंगल बनविले जात आहे. त्यासाठी झाडेही मुळासकट तोडली जात आहेत. नेरळच्या खांडा भागात वनविभागाच्या कार्यालयाच्या बाजूला इमारती बांधण्यासाठी त्या जागेत असलेली झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे झाडे तोडण्यास वनविभागाची मूक संमती असल्याचे दिसून येत असून, नेरळ ग्रामपंचायतने अद्याप त्या जागेवर इमारत बांधण्यास परवानगी दिली नाही; परंतु खोदकाम सुरू आहे.

नेरळ गावातील खांडा भागात इमारती बांधल्या जाणार आहेत. त्यामुळे तेथे असलेली झाडे इमारत बांधण्यास अडथळा ठरत आहेत. नेरळ ग्रामपंचायतीकडे जागेच्या मालकाने झाडे तोडण्याची परवानगी मागितली होती. मात्र, ग्रामपंचायतने वनविभागाची परवानगी घेऊन झाडे तोडावीत, असे सूचित केले. या जागेपासून हाकेच्या अंतरावर वनविभागाचे कार्यालय असून, त्या ठिकाणी वनविभागाचे अधिकारी हे दररोज चार वेळा ये-जा करीत असतात. त्या जागेतील १०० वर्षे जुनी झाडे कटर मशिन लावून तोडली जात आहेत. त्या जागेतील झाडे तोडण्याचे काम लाकूडतोडे गेली आठवडाभर करीत असून त्यांचे काम आणखी आठ-दहा दिवस चालणार आहे. मात्र, ठेकेदार असलेल्या झाडे तोडणाऱ्याला वनविभागाचे कार्यालय त्या झाडांपासून ९० मीटर अंतरावर असूनदेखील कोणतीही भीती नाही.याबद्दल नेरळ ग्रामपंचायतीकडे चौकशी केली असता कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्याची परवानगी आम्ही दिली नाही. त्या जागेचे मालक अल्ताफ मुजेद यांचा बांधकाम परवानगीसाठी अर्ज आला आहे. मात्र, अद्याप त्या जागेवर बांधकाम परवानगी दिली नाही, असे सांगण्यात आले.

आमच्या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या जागेतील झाडे ही इंजायली आहेत, त्यामुळे त्यांचे महत्त्व वनविभागात नाही. त्यांनी आमच्या कार्यालयाकडे झाडे तोडण्याची परवानगी मागितली होती, त्यांना परवानगी दिली असून त्यासाठी कोणतेही दंड आकारले नाही.- नारायण राठोड, वन अधिकारीवनविभाग स्थानिकांनी घरात सरपण म्हणून सुकलेले झाड तोडले तरी लगेच पोहोचतात. मात्र, त्यांच्या कार्यालयाच्या बाजूला झाडे तोडूनदेखील वनविभाग काही करीत नाही याचे आश्चर्य वाटते. दुसरीकडे त्यासाठी कोणताही दंड आकारला नाही.- संजय अभंगे, सामाजिक कार्यकर्तेआमच्याकडे अर्ज आला आहे. मात्र, आम्ही आधी वनविभागाची परवानगी घेऊन झाडे तोडावीत, असे सूचित केले आहे. त्यांना बांधकाम परवानगी दिली नाही. मात्र, खोदकाम सुरू केले असल्यास आमचे पथक त्या जागेवर जाऊन माहिती घेईल.- संजय राठोड, ग्रामविकास अधिकारी