शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्रातून मतदारांमध्ये जनजागृती; पुढील काही दिवस सुरू राहणार मार्गदर्शन

By निखिल म्हात्रे | Updated: March 6, 2024 21:26 IST

लोकसभा निवडणुकीसाठीची प्रशासकीय पातळीवरची तयारी निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: लोकसभा निवडणुकीसाठीची प्रशासकीय पातळीवरची तयारी निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यासाठी तालुका प्रशासन कामाला लागले आहे. ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून गावागावात जनजागृती सुरु करण्यात आली आहे. पुढील काही दिवस ती सुरू राहणार आहे.

अलिबाग तहसील कार्यालयात ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र उभारण्यात आले असून, या केंद्राद्वारे मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून 800 हून अधिक मतदारांनी या केंद्राला भेट दिली आहे. एकीकडे राजकीय वातावरण तापत असले तरी दुसरीकडे निवडणूक विभाग तयारीला लागले आहे.

लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. ईव्हीएम मशीनबरोबरच व्हीव्ही पॅट मशीनदेखील जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांपर्यंत जनजागृती करण्याचे काम जिल्हा प्रशासनामार्फत सुरु करण्यात आले. मतदान करण्यापासून, मतदान केल्यावर कोणाला मतदान केल्याची माहिती मतदारांना कशी मिळणार आहे. याबाबत प्रात्यक्षिकांद्वारे सांगण्याचे काम तालुका स्तरावर सुरु केले आहे. अलिबाग येथील तहसील कार्यालयात प्रात्यक्षिक केंद्र सुरु केले आहे.

अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अजित टोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु आहे. रामराजचे मंडळ अधिकारी आर.एम. मांढरे, रेवदंड्यातील तलाठी संजय शिंगे, रामराजचे तलाठी पी.एस. थोरात, थळचे तलाठी मयूर नाईक यांची याठिकाणी निवड केली आहे. तहसील कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मतदार या प्रात्यक्षिक केंद्राला भेट देत आहेत. यातून मतदारांपर्यंत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ईव्हएम स्वतःची कार्यक्षमता आणि स्थिती याबाबत नागरिकांना माहिती देण्यात येत आहे. तसेच नागरिकांचे अभिप्राय घेऊन त्यांच्या शंका व प्रश्नांचे निरसन करण्यात येत आहे.

टॅग्स :alibaugअलिबाग