शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सरासरी 84 टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 01:06 IST

७८ ग्रामपंचायतींसाठी ६१४ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

लोकमत न्यूज नेटवर्क रायगड : जिल्ह्यातील ७८ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८४ टक्के मतदान झाले. ३०२ मतदान केंद्रांवर शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेपासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. ६१४ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद झाले आहे. १८ जानेवारी राेजी मतमाेजणी हाेणार असल्याने उमेदवारांची धाकधूक पुढील दाेन दिवस कायम राहणार आहे.

शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. कोरोना नियमांचे पालन करून मतदारांना मतदानासाठी मतदान कक्षात प्रवेश देण्यात येत हाेता. सुरुवातीला सकाळी मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी पाहायला मिळाली. त्यानंतर गर्दी वाढत हाेती. दुपारी पुन्हा मतदारांनी ब्रेक घेतला. नंतर पुन्हा मतदानाला प्रारंभ झाला. पेझारी ग्रामपंचायतीमध्ये मतदान यंत्रात बिघाड झाल्याने परस्पर दाेघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. पाेलिसांनी हस्तक्षेप करीत वाद मिटविला. मतदान यंत्रातील बिघाडही दूर करण्यात आला, तसेच काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्येही बिघाड झाले हाेते. तेथे तातडीने नवीन मतदान यंत्रे देण्यात आली असल्याचे उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी सांगितले. सकाळी साडेसात ते साडेनऊ या कालावधीत १४.८० टक्के मतदान झाले हाेते. साडेसात ते साडेअकरा ३५.१२ टक्के, साडेसात ते दीड वाजेपर्यंत ५४.३५ टक्के मतदान झाले, तर साडेसात ते साडेतीन या कालावधीत ६८.०५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ६१२ जागांसाठी १ हजार ५८८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदाराने मास्क लावले नसेल तर त्याला कक्षात सोडले जात नव्हते. प्रत्येक मतदाराचे शारीरिक तापमान, ऑक्सिजनची क्षमता तपासली जात होती. मतदान केंद्राबाहेर सॅनिटायझरही ठेवण्यात आले होते. पेणमध्ये सात ग्रामपंचायतीसाठी ६७ ११ हजार  ११,८३८ मतदारांनी मतदान केले.  दुपारी ४ वाजेपर्यत ७७ टक्के मतदान  झाले.

कर्जतमध्ये ८७ टक्के मतदानn कर्जत : तालुक्यातील हुमगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने उर्वरित ८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले. तालुक्यात १७ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने आता ७१ जागांसाठी १६४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.  n बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये सरळ सामना अपेक्षित आहे. शुक्रवारी सकाळी बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती. मात्र, यावेळी सोशल डिस्टसिंगचे तीनतेरा वाजल्याचे पाहायला मिळाले. ग्रामपंचायतीसाठी सरासरी ८७ टक्के मतदान झाले असून, १८ तारखेला मतमोजणी होणार आहे.n तालुक्यात कोल्हारे, जिते, पोशिर, साळोख तर्फ वरेडी, हुमगाव, कडाव, वैजनाथ, भिवपुरी, आणि दामत या नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी हुमगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली.n  कोल्हारे ग्रामपंचायतींमध्ये रुक्मिणी हिलाल या ९२ वर्षांच्या आजींनी मतदान केले. मतदारांनी मास्क लावले होते परंतु सोशल डिस्टसिंगचे तीन - तेरा उडाले होते.

टॅग्स :RaigadरायगडElectionनिवडणूक