शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

जागरूक नागरिकांमुळे चोर अटकेत

By admin | Updated: October 1, 2015 23:45 IST

माणगांवमधील जागरूक नागरिक गणेश ठाकरे व दाजी कदम यांच्या समयसूचकतेमुळे सराईत मोटारसायकल चोरास गजाआड करण्यात माणगांव पोलिसांना यश आले आहे.

अलिबाग : माणगांवमधील जागरूक नागरिक गणेश ठाकरे व दाजी कदम यांच्या समयसूचकतेमुळे सराईत मोटारसायकल चोरास गजाआड करण्यात माणगांव पोलिसांना यश आले आहे. माणगांवमधील एका नागरिकाची मोटारसायकल (क्र.एमएच ०६, बीएच ५३३३) ही जुने माणगांव काळ नदीच्या पुलाजवळून २७ सप्टेंबरला रात्री बारा वाजण्याच्या सुमारास चोरीस गेल्याबाबत तक्रार माणगांव पोलीस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्याच्या तपासात फिर्यादी यांच्या परिचयाचे माणगांवचेच रहिवासी गणेश ठाकरे व दाजी कदम यांना निजामपूर पोलीस ठाणे हद्दीत ही मोटारसायकल दिसली. याबाबत त्यांनी चौकशी केली असता, मोटारसायकलमधील पेट्रोल संपल्याने ते आणण्याकरिता कोणीतरी माणूस मोटारसायकल उभी करुन गेल्याचे त्यांना समजले. या माणसाबाबत त्यांनी पेट्रोल पंपावर जावून चौकशी केली असता, एक माणूस गाडीकरिता पेट्रोल घेण्याकरिता बाटली घेवून आल्याचे दिसले. त्यास ठाकरे व कदम त्यांनी गोड बोलून मोटारसायकलजवळ आणले व या प्रकाराची माहिती माणगांव पोलिसांना दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.आर.पेंदाम, पोलीस हवालदार ए.व्ही. सुद, पोलीस नाईक आर.बी. म्हात्रे यांनी तत्काळ येवून आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीने अनेक मोटारसायकल चोरल्या असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्याने, मोटार चोरीचे अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता माणगांव पोलिसांनी व्यक्त केली आहे.(विशेष प्रतिनिधी)