शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बदनामी करणाऱ्यांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करणार!

By admin | Updated: April 12, 2016 00:39 IST

बनावट कागदपत्रे तयार करून समाज कल्याण विभागाची बदनामी करण्याचा प्रयत्न विरोधकांनी सुरू केला आहे. समाज कल्याण विभागात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही.

अलिबाग : बनावट कागदपत्रे तयार करून समाज कल्याण विभागाची बदनामी करण्याचा प्रयत्न विरोधकांनी सुरू केला आहे. समाज कल्याण विभागात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. याविरोधात अ‍ॅट्रॉसिटी आणि अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती समाज कल्याण सभापती गीता जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.मागासवर्गीयांनी पुरविण्यात येणाऱ्या संगणक खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज होऊन शिवसेनेत गेलेले रायगड जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. राजीव साबळे यांनी केला होता. संगणक वाटपासाठी २५ लाख रुपयांची तरतूद समाज कल्याण विभागाने केली होती. सरकारच्या निर्देशानुसारच कोनीका मिन्लोटा बिझनेस सोलुशन इंडिया प्रा. लि. या संस्थेकडून संगणक खरेदी करण्यात आले होेते. जिल्ह्यातील ६७ मागासवर्गीयांची यासाठी निवड करण्यात आली आहे. ३६ हजार ९४५ रुपयांप्रमाणे २४ लाख ७५ हजार ३१५ रुपये खर्च करण्यात आले. मात्र साबळे यांनी ६६ संगणकांसाठी ४५ हजार ८५० रुपयांप्रमाणे ३१ लाख ७७ हजार ४०५ रुपये खर्च केल्याचे सांगितले होते. साबळे यांनी सादर केलेली कागदपत्रे खोटी आहेत. त्यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश गोटे आणि तत्कालीन समाज कल्याण अधिकारी संदीप जाधव यांच्या खोट्या सह्या असल्याचा दावा गीता जाधव यांनी केला. समाज कल्याण विभागाकडे असणारा सर्व दस्तऐवजांचा रेकॉर्ड त्यांनी पत्रकार परिषदेत उघड केला.साबळे यांनी समाज कल्याण विभागाची बदनामी केली आहे. भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले आहेत. साबळे यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी आणि अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले. आरोपामध्ये तथ्य नसून मी कोणत्याही चौकशीला जाण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केल्याने अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा कसा दाखल करता येईल असा प्रश्न जि.प सदस्य अ‍ॅड. राजीव साबळे यांनी के ला.दोन वेगवेगळी कागदपत्रेसमाज कल्याण विभागातून दोन वेगवेगळी कागदपत्रे पुढे येत असतील, तर ही गंभीर बाब आहे. अन्य योजनांमध्येही भ्रष्टाचाराला वाव आहे, असे रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य अ‍ॅड. राजीव साबळे यांनी सांगितले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश गोटे यांच्या सह्या आढळल्याने त्यांनी पोलीस कारवाईची मागणी करणारे पत्र समाज कल्याण अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यावर कारवाई का झाली नाही, असा प्रश्नही त्यांनी के ला.