लोकमत न्यूज नेटवर्कबिरवाडी : महाड शहरानजीक असणाऱ्या गांधारपाले लेणी येथे जास्त वेळ बसू नको असे सांगणाऱ्या ५३ वर्षीय व्यक्तीस २१ वर्षीय तरुणाने मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.पांडुरंग पोटसुरे (५३, रा. महाड) हे १० मे रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मौजे गांधारपाले लेणी येथे कर्तव्यास असताना सागर पवार (२१, रा. नाते महाड) येथे लेणी पाहण्यासाठी आला असता खूप वेळ पायऱ्यांवर बसून राहिला त्यावेळी पांडुरंग पोटसुरे यांनी त्यास जास्त वेळ बसू नका, खाली जा असे सांगितले. या गोष्टीचा मनात राग धून काठीने पांडुरंग पोटसुरे यांना मारहाण केली. सागर पवार याला १० मे रोजी रात्री अटक केली आहे.
गांधारपाले येथे मारहाण करणाऱ्यास अटक
By admin | Updated: May 12, 2017 01:53 IST