शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

आशा सेविकांची जिल्हा परिषदेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 22:56 IST

प्रलंबित मागण्याचे निवेदन; वाचनालयाच्या चौकात पोलिसांनी अडविले

अलिबाग : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी तसेच कामगार विरोधी कायदे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी ८ जानेवारी २०२० रोजी देशव्यापी एक दिवसीय संपाचे हत्यार महाराष्ट्र राज्य आशा-गट प्रवर्तक कर्मचारी कृती समितीने उपसले आहे. विविध प्रलंबीत मागण्याचे निवेदन त्यांनी सोमवारी जिल्हा परिषद प्रशासनाला दिले. संघटनेने काढलेल्या मोर्चाला सार्वजनिक वाचनालयाच्या चौकात पोलिसांनी अडवले. त्याच ठिकाणी मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.संपामध्ये शासकीय, निमशासकीय कर्मचारी, औद्योगिक कामगार, सेवा क्षेत्रातील कामगार असंघिटत क्षेत्रातील कामगार सहभागी होणार आहेत. भारतीय श्रम परिषदेच्या ४५ व ४६ व्या शिफारशीनुसार आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, त्यांना १८ हजार रुपये किमान वेतन लागू करण्यात यावे, सामाजिक सुरक्षेचा लाभ देण्यात यावा, सार्वजनिक आरोग्य सेवांचे खासगीकरण करु नये, राष्ट्रीय आरोग्य अभियान कायम स्वरुपी करावे, केंद्र अर्थसंकल्पात राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी, महाराष्ट्र सरकारच्या १६ सप्टेंबर २०१९ च्या सरकारी आदेशानुसार आशांना कामाच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची वाढ मंजूर केली आहे. याच आदेशात गटप्रवर्तकांना तीन हजार ५०० रुपयांची वाढ करण्याची दुरुस्तीसह सरकारी आदेश काढावा आणि त्याची अंमलबजावणी १ आॅक्टोबर २०१९ पासून करावी, आशांना सायकल द्यावी, आंगणवाडी सेविकांप्रमाणे मिळणारा बोनस लागू करावा. पीएफ आणि ग्रॅज्युएटी लागू करावी, सर्व्हेसाठी घरटी २० रुपये द्यावे यासह अन्य मागण्याचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे.याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष एम.ए.पाटील, रायगड जिल्हा संघटक रश्मी म्हात्रे, दिनकर म्हात्रे, निलेश दातखिळे आदींसह पदाधिकारी, आशा सेविका आणि प्रवर्तक उपस्थित होते.