शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक करून एटीएममधील पैसे काढणारे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 01:39 IST

१५ फेब्रुवारी रोजी एटीएममध्ये पैसे काढते वेळी मदत केलेल्या व्यक्तीने त्यांचे एटीएम बदलून त्यातून पैसे काढल्याचे चंदने यांच्या लक्षात आले. त्याप्रकरणी चंदने यांनी कर्जत पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : एका व्यक्तीचे एटीएम घेऊन त्याच्या पिन कोडची माहिती घेऊन या व्यक्तीच्या खात्यातील पैसे एटीएमच्या माध्यमातून काढून त्याची फसवणूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. १५ फेब्रुवारी रोजी कर्जत शहरातील प्रकाश चंदने कर्जतमधील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममधील मशीनमध्ये पैसे काढण्याकरिता गेले असता एटीएममध्ये त्यांच्या पाठीमागे असलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्या एटीएमची अदलाबदल करून एटीएम कार्डचा पिन नंबर घेऊन तिथून निघून गेले होते. कालांतराने प्रकाश चंदने यांच्या खात्यामधून वेळोवेळी एकूण ७६ हजार ४०० रुपये डेबिट झाल्याचे मेसेज मोबाईलवर आल्याने त्यांना समजले, त्यावेळी आपल्या जवळ असलेले एटीएम कार्ड आपले नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

१५ फेब्रुवारी रोजी एटीएममध्ये पैसे काढते वेळी मदत केलेल्या व्यक्तीने त्यांचे एटीएम बदलून त्यातून पैसे काढल्याचे चंदने यांच्या लक्षात आले. त्याप्रकरणी चंदने यांनी कर्जत पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. कर्जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन गावडे करीत होते. तपास करीत असताना आरोपी चंद्रशेखर कुमार प्रदीप सहानी याला उस्मानाबाद येथून ताब्यात घेतले असता गुन्हा केल्याचे कबूल करून त्याचा साथीदार प्रमोद सगीचद सहानी यास तळेगाव दाभाडे एमआयडीसी, पुणे येथून पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे.

आरोपींनी रायगड जिल्ह्यात अशा प्रकारचे किती गुन्हे केले आहेत, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुबे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन गावडे, पोलीस शिपाई भूषण चौधरी, पोलीस शिपाई अश्रुबा बेंद्रे यांनी तपास केला. 

टॅग्स :Raigadरायगड