शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

अर्णब गाेस्वामीप्रकरणी ५ डिसेंबरला निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 06:00 IST

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गाेस्वामी, फिराेज शेख आणि नितेश सारडा यांना बुधवार ४ नाेव्हेंबर राेजी अटक करण्यात आली हाेती

रायगड : अर्णब गोस्वामी यांच्या विराेधात जिल्हा सत्र न्यायालयात दाखल असलेल्या पुनर्निरीक्षण अर्जावर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. आजपासून न्यायालय सुट्टीवर गेल्याने आता ५ डिसेंबर तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातील आराेपी अर्णब गाेस्वामी, फिराेज शेख आणि नितेश सारडा यांना न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गाेस्वामी, फिराेज शेख आणि नितेश सारडा यांना बुधवार ४ नाेव्हेंबर राेजी अटक करण्यात आली हाेती. त्यानंतर अलिबाग येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले हाेते. सुमारे आठ तास या खटल्याची सुनवाणी सुरू हाेती. दाेन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आराेपींची १४ दिवसांसाठी न्यायालयीन काेठडीत रवानगी केली हाेती. रायगड पाेलिसांना गाेस्वामी यांची पोलीस काेठडी पाहिजे हाेती. न्यायालयाच्या या निर्णयानंतर रायगड पाेलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले. गाेस्वामी यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली, मात्र अलिबागच्या न्यायालयातूनच न्याय मिळावा, असे उच्च न्यायालयाने सांगत गाेस्वामी यांचा अर्ज फेटाळून लावला हाेता. गाेस्वामी यांच्यासह सारडा आणि शेख यांना अलिबाग नगरपालिकेच्या शाळेतील उपकारागृहात ठेवण्यात आले हाेते. 

जिल्हा सत्र न्यायालयातील रायगड पाेलिसांच्या पुनर्निरीक्षण अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली हाेती. दिवाळीच्या सुट्टीमुळे न्यायालयाने निकाल राखून ठेवला हाेता. न्यायालय २३ नाेव्हेंबर राेजी निकाल देण्याची शक्यता हाेती. मात्र आज न्यायालय सुट्टीवर गेले आहे. त्यामुळे आता ५ डिसेंबर तारीख दिली आहे.- ॲड. निहा राऊत, आराेपीच्या वकील

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीRaigadरायगडCourtन्यायालय