शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

माणगाव तालुक्यातील लोणेरे, टेंपाले, देवळी ग्रामपंचायतींवर सेनेची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 01:58 IST

रवींद्र टेंबे, संजिदा दाखवे, विनेश डवले यांची निवड

माणगाव : तालुक्यातील लोणेरे, टेंपाले, देवळी ग्रामपंचायतीवर सेनेचा भगवा फडकला. लोणेरे सरपंचपदी सेनेचे रवींद्र टेंबे तर टेमपाले सरपंचपदी संजिदा दाखवे, देवळी ग्रामपंचायत सरपंच विनेश डवले यांची निवड झाली.माणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत ११ पैकी १० सदस्य निवडून आणत विरोधकांना पुन्हा एकदा धूळ चारत गेली. २५ वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेली लोणेरे ग्रामपंचायत सरपंचपदी पुन्हा एकदा भगवा फडकला असून सरपंचपदी शिवसेनेचे विद्यमान विभागप्रमुख रवींद्र टेंबे यांची वर्णी लागली असून उपसरपंचपदी प्रमोद करकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली, जिल्हाप्रमुख अनिल नवगुणे, माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, उपसभापती महेंद्र तेटगुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या माणगाव तालुक्यातील लोणेरे, टेमपाले, देवळी ग्रामपंचायत सरपंचपदी सेनेचेच सरपंच, उपसरपंच विराजमान झाले आहेत. यावेळी सदस्य प्रकाश टेंबे, समाधान करकरे, सुजाता टेंबे ज्योती ढेपे, शिवाजी ढेपे, अनुष्का टेंबे, प्रियंका श्रीनिवास टेंबे, यांच्यासह अन्य सदस्य देखील उपस्थित होते.टेमपाले ग्रामपंचायतीच सरपंच निवडणुकीत शिवसेना पाच तर राष्ट्रवादीच्या चार सदस्य असे संख्याबळ असून सरपंचपदी सेनेच्या संजिदा दाखवे तर उपसरपंचपदी गणेश खेळू शिगवण यांची वर्णी लागली आहे. यावेळी सदस्य रूखसार गजगे, गणेश शिगवण, वनिता आंबेकर, शाखाप्रमुख निजाम गजगे, अंकित सैन, हिनायत असलूनकर, अलताफ गोडमे आदींनी शुभेच्छा दिल्या.बारवई ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्तामाेहाेपाडा : बारवई ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून, सरपंचपदी नियती बाबरे, तर उपसरपंचपदी ललिता पडवळ बिनविरोध निवडून आले. बारवई ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या ॲड. नियती नीलेश बाबरे व उपसरपंचपदी ललीता वामन पडवळ यांची बिनविरोध निवड झाल्याने शिवसेनेत चैतन्य निर्माण झाले आहे.बारवई ही ग्रामपंचायत याअगोदर शिवसेना सोडून इतर पक्षांकडे असायची. परंतु नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सातपैकी महाआघाडीच्या सहा जागा तर बीजेपी-मनसे युतीची एक जागा निवडून आली. यात शिवसेनेकडून सरपंच पदासाठी ॲड. नियती नीलेश बाबरे, तर उपसरपंचपदासाठी ललिता वामन पडवल यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सरपंच व उपसरपंच यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.     बारवई ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी ॲड. नियती नीलेश बाबरे, तर उपसरपंचपदी ललिता वामन पडवल यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी नवनिर्वाचित सरपंच ॲड. नियती नीलेश बाबरे, उपसरपंच ललिता वामन पडवल, सदस्य म्हणून प्रतीक्षा दीपक तारे, उषा किसन वाघमारे, कीर्ती समीर दळवी आदी उपस्थित होते.