शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

वर्गणी गोळा करणाऱ्यांना बसणार चाप

By admin | Updated: July 28, 2016 03:48 IST

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यासह विविध राष्ट्रीय महापुरुषांची जयंती साजरी करणाऱ्यांवर धर्मदाय आयुक्तांनी आपली वक्रदृष्टी केली आहे. वर्गणी गोळा करण्याआधी त्यांना

- आविष्कार देसाई,  अलिबाग

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यासह विविध राष्ट्रीय महापुरुषांची जयंती साजरी करणाऱ्यांवर धर्मदाय आयुक्तांनी आपली वक्रदृष्टी केली आहे. वर्गणी गोळा करण्याआधी त्यांना आता धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे आॅनलाइन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यंदाच्या गणेशोत्सवापासून या योजनेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे वर्गणी गोळा करु न आपले खिसे भरणाऱ्यांना चांगलाच चाप लागणार असल्याचे बोलले जाते.सार्वजनिक कार्यक्र म करताना वर्गणी मागण्याचे, गोळा करण्याचे फॅड जुनेच आहे. मंडळाच्या नावावर वर्गणी गोळा करून आपलाच खिसा भरण्याची सवय मंडळांमधील काही कार्यकर्त्यांची असते. वर्गणी गोळा करताना दमदाटी करण्याचेही अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे वाद निर्माण होत असे. त्याचा त्रास सर्वसामान्यांना होत होता. अशा प्रवृत्तीमुळे काही सार्वजनिक मंडळे बदनाम झाली आहेत. यातून सुटका करण्यासाठी धर्मदाय आयुक्तांनी कंबर कसली आहे. पारंपरिक पद्धतीची नोंदणी रद्द करून ती आॅनलाइन करण्यात आली आहे. यंदापासून ही आॅनलाइन नोंदणी करणे आवश्यक करण्यात आले आहे. यापूर्वी असलेल्या कागदोपत्री नोंदणीच्या माध्यमातून मंडळांना नोंदणीसाठी अधिक वेळ द्यावा लागत होता. शिवाय या प्रक्रियेत पारदर्शकता राहण्याबाबतही साशंकता व्यक्त करण्यात येत होती. मंडळातील वर्गणी गोळा करण्याच्या पद्धतीवर अनेकदा ताशेरे ओढले जात होते. मंडळाच्या जमाखर्चावरून वाद झाल्याच्या घटनाही घडताना समोर आल्या होत्या.येत्या गणेशोत्सवापासूनच या नवीन आॅनलाइन पद्धतीचा श्रीगणेशा करण्यात येणार आहे. चॅरिटी महाराष्ट्र या नावाने असलेल्या संकेतस्थळावर आॅनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील महिन्यात १० आॅगस्टपासून या नोंदणीला सुरूवात होणार आहे.१० आॅगस्टपासून नोंदणी येत्या गणेशोत्सवापासूनच या नवीन आॅनलाइन पद्धतीचा श्रीगणेशा करण्यात येणार आहे. चॅरिटी महाराष्ट्र या नावाने असलेल्या संकेतस्थळावर आॅनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील महिन्यात १० आॅगस्टपासून या नोंदणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी त्या दृष्टीने तयारी करणे आवश्यक आहे. यामुळे एकप्रकारे मंडळांवर नियंत्रणच आले आहे.आॅनलाइन नोंदणीसाठी शपथपत्र आवश्यकआॅनलाइन नोंदणी करण्यासाठी मंडळाचा गेल्या वर्षीचा लेखापरीक्षण अहवाल अथवा पाच हजारांच्या आत वर्गणी असल्यास शपथपत्र आवश्यक करण्यात आले आहे. वर्गणी गोळा करण्यासाठी आॅनलाइन प्रक्रि या निर्णय सरकारने घेतल्याने अनेक सार्वजनिक मंडळांची गोची झाली आहे. यामुळे सार्वजनिक मंडळांमध्ये नाराजी दिसून येत आहे.श्रावण महिना ते नवरात्रोत्सव या कालावधीत दहीहंडी उत्सव, नारळ फोडी स्पर्धा, सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, साखरचौथ गणेशोत्सव, विविध क्र ीडा स्पर्धा, या स्पर्धा घेण्यासाठी सार्वजनिक मंडळे वर्गणी गोळा करतात. पूर्वी साधे पावतीबुक, मंडळाचा रजिस्टर नंबर असला तरीही वर्गणी गोळा करता येत होती. त्याला चाप बसणार आहे.मंडळातील वर्गणी गोळा करण्याच्या पद्धतीवर अनेकदा ताशेरे ओढले जात होते. मात्र या आॅनलाइन प्रक्रि या निर्णयामुळे पारदर्शकता येणार आहे. आॅनलाइन नोंदणी केल्याने सर्वांनाच फायदा होणार आहे. वेळेची आणि पैशाची बचत होणार असल्याने सर्व मंडळे, संस्थांनी या योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे. नोंदणी विनामूल्य आहे.- डी. के. पाटील, सहायक धर्मदाय आयुक्त